मोदींना दिलासा, गुजरात दंगलीसंदर्भातील याचिका फेटाळली
By Admin | Updated: January 15, 2015 11:17 IST2015-01-15T10:12:04+5:302015-01-15T11:17:13+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात २००२ च्या गुजरात दंगलीसंदर्भात न्यूयॉर्कमधील न्यायालयात सुरु असलेला खटला न्यायधीशांनी रद्द केला आहे.

मोदींना दिलासा, गुजरात दंगलीसंदर्भातील याचिका फेटाळली
ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. १५ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात २००२ च्या गुजरात दंगलीसंदर्भात न्यूयॉर्कमधील न्यायालयात सुरु असलेला खटला बंद करण्याचा आदेश न्यायधीशांनी दिले आहे. नरेंद्र मोदी हे एका देशाचे प्रमुख असल्याने त्यांना सूट मिळू शकते असे सांगत कोर्टाने हा खटला निकाली काढला.
अमेरिकेतील मानवाधिकार संघटना अमेरिका जस्टीस सेंटरने मोदींविरोधात स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना २००२ मध्ये झालेल्या दंगलीविरोधात ही याचिका दाखल झाली होती. मोदी हे एका देशाचे प्रमुख आहेत, त्यामुळे राजनैतिक अधिकारांतर्गंत त्यांना सूट मिळू शकते असे स्पष्टीकरण सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर दिले होते. या आधारे न्या. एनालिझा टॉरेस यांनी तीन पानी निकाल देत मोदींविरोधात सुरु असलेला खटलाच बंद करण्याचे आदेश टॉरेस यांनी दिले.