विमानाचे पंख उडता उडता दुरुस्त होणार

By Admin | Updated: June 9, 2015 00:12 IST2015-06-09T00:12:01+5:302015-06-09T00:12:01+5:30

ब्रिटिश शास्त्रज्ञांनी उडता उडता दुरुस्त होतील असे विमानाचे पंख तयार केले असून, नादुरुस्त झाल्यानंतर स्वत:च स्वत:ची दुरुस्ती करणारी यंत्रणा लवकरच सर्वत्र वापरात येईल असा दावा करण्यात येत आहे.

The plane's wings fly right away | विमानाचे पंख उडता उडता दुरुस्त होणार

विमानाचे पंख उडता उडता दुरुस्त होणार

लंडन : ब्रिटिश शास्त्रज्ञांनी उडता उडता दुरुस्त होतील असे विमानाचे पंख तयार केले असून, नादुरुस्त झाल्यानंतर स्वत:च स्वत:ची दुरुस्ती करणारी यंत्रणा लवकरच सर्वत्र वापरात येईल असा दावा करण्यात येत आहे.
हे संशोधन लंडनमधील रॉयल सोसायटीच्या या आठवड्यातील बैठकीत सादर केले जाणार आहे. ब्रिस्टॉल विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे पथक गेली तीन वर्षे हे तंत्रज्ञान विकसित करत आहेत.
यासंदर्भात बोलताना प्रमुख संशोधक प्रा. डंकन वास यांनी असे सांगितले की, नजीकच्याच भविष्यात अशी स्वत:च स्वत:ची दुरुस्ती करणारी उपकरणे बाजारात येतील. ते व त्यांचे सहकारी कार्बन फायबर असणारे हलके; पण बळकट असे मटेरियल तयार करत असून, त्याचा वापर विमानांचे पंख, विविध खेळांच्या रॅकेट्स व स्पेशल सायकलीसाठी करता येणार आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: The plane's wings fly right away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.