शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

टेक ऑफनंतर विमान तिरके झाले अन्... नेपाळमधील अपघाताचा VIDEO समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 14:39 IST

Nepal Plane Crash Video : नेपाळमधील विमान अपघात दुर्घटनेचा धक्कादायक व्हिडीओ आता समोर आला आहे.

Nepal Plane Crash :नेपाळमध्ये पुन्हा एकदा एक मोठा विमानअपघात झाला आहे. नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर 9N-AME हे विमान उड्डाण घेतल्यानंतर काहीवेळात कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार, विमानात १९ जण होते ज्यापैकी १८ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात केवळ विमानाचा पायलट बचावला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आता या विमानाच्या अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. काही क्षणात विमान खाली कोसळले आणि त्याने पेट घेतल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. 

नेपाळची राजधानी काठमांडू येथे विमान कोसळले आहे. विमानातील १९ जणांपैकी १८ जणांचा मृत्यू झाला. जखमी पायलट कॅप्टन एम. शाक्य यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे विमान काठमांडूहून पोखराला जात होते. सकाळी ११ वाजता त्रिभुवन विमानतळावरून विमानाने उड्डाण केले आणि काही क्षणातच ते कोसळले. 9N-AME हे विमान सौर्य एअरलाइन्सचे होते. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी १७ जण सूर्या एअरलाइन्सचे कर्मचारी होते, तर उर्वरित २ क्रू मेंबर्स होते.

अपघातानंतर लगेचच विमानतळावरील पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचले. अपघातानंतर विमानाला आग लागली. या आगीनंतर विमान पूर्णपण जळून खाक झाले. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. व्हिडीओमध्ये विमान टेक ऑफनंतर अचानक तिरके झाले आणि विमानतळावर पुढे जाऊन कोसळले. यानंतर विमानाने पेट घेतला. क्षणात आगीने रौद्र रुप धारण केल्यामुळे कोणालाही पळता आले नाही.

माध्यमांच्या वृत्तानुसार तांत्रिक दोषामुळे ही घटना घडली असल्याचे म्हटलं जात आहे. अपघातग्रस्त विमान इंजिन चाचणीसाठी पोखरा येथे जात होते. नेपाळ नागरी उड्डाण प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, विमानातील लोक अभियंता आणि तंत्रज्ञ होते. हे विमान महिनाभर पोखरा येथील एका हँगरमध्ये ठेवण्यात आले होते.

टॅग्स :NepalनेपाळairplaneविमानAirportविमानतळAccidentअपघात