ऑस्ट्रेलियात शॉपिंग मॉलवर कोसळलं विमान,5 जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2017 22:17 IST2017-02-21T22:17:00+5:302017-02-21T22:17:00+5:30

ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये एका शॉपिंग सेंटरवर एक छोटं विमान कोसळलं यामध्ये 5 जणांचा मृत्यू

A plane collapses in shopping malls in Australia, killing 5 people | ऑस्ट्रेलियात शॉपिंग मॉलवर कोसळलं विमान,5 जणांचा मृत्यू

ऑस्ट्रेलियात शॉपिंग मॉलवर कोसळलं विमान,5 जणांचा मृत्यू

>ऑनलाइन लोकमत 
मेलबर्न, दि. 21 - ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये एका शॉपिंग सेंटरवर एक छोटं विमान कोसळलं यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या 30 वर्षांतला हा सर्वात भीषण अपघात असल्याचं सांगितलं जात आहे. 
 
मंगळवारी सकाळी 9 वाजता (स्थानिक वेळेनुसार) हा अपघात झाला. मेलबर्नच्या एडनसन विमानतळावरून हे विमान किंग आयलॅंडला जात होतं. किंग आयलॅंडसाठी उड्डाण भरल्यानंतर थोड्यावेळातच विमानाचं इंजिन खराब झालं आणि त्यामुळे ते क्रॅश झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मृत्यूमुखी पडलेले पाचही जण हे त्या विमानातील आहेत. शॉपिंग सेंटरच्या ज्या भागावर विमान कोसळलं सुदैवाने त्या ठिकाणी त्यावेळी कोणीही नव्हतं त्यामुळे आणखी जिवीतहानी टळली.  
 

Web Title: A plane collapses in shopping malls in Australia, killing 5 people