विमान धावपट्टीवरून घसरले; २३८ जण बालंबाल बचावले!
By Admin | Updated: March 5, 2015 01:08 IST2015-03-05T01:08:25+5:302015-03-05T01:08:25+5:30
काठमांडू येथे बुधवारी तुर्की एअरलाईन्सचे विमान उतरत असताना दाट धुक्यामुळे ते धावपट्टीवरून घसरून बाजूच्या मैदानावर विसावले. तथापि, विमानातील २४० प्रवासी बालंबाल बचावले.

विमान धावपट्टीवरून घसरले; २३८ जण बालंबाल बचावले!
काठमांडू येथे बुधवारी तुर्की एअरलाईन्सचे विमान उतरत असताना दाट धुक्यामुळे ते धावपट्टीवरून घसरून बाजूच्या मैदानावर विसावले. तथापि, विमानातील २४० प्रवासी बालंबाल बचावले. इस्तंबूलहून आलेले विमान एअरबस ए-३३० त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरतेवेळी धावपट्टीवरून घसरले. विमानात २२७ प्रवासी व चालक दलाचे ११ सदस्य होते. सर्वांना आपत्कालीन दरवाजाने बाहेर काढण्यात आले. कमी दृश्यतेमुळे हा अपघात झाल्याचे वृत्त आहे.