विमान कोसळून २१ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 04:33 IST2018-09-10T04:33:03+5:302018-09-10T04:33:05+5:30

क्षमतेहून जास्त प्रवासी घेऊन व्यापारी उड्डाण करणारे एक विमान रविवारी दक्षिण सूदानमध्ये एका सरोवरात कोसळून 21 प्रवासी ठार झाले.

Plane collapses 21 dead | विमान कोसळून २१ ठार

विमान कोसळून २१ ठार

ज्युडा: क्षमतेहून जास्त प्रवासी घेऊन व्यापारी उड्डाण करणारे एक विमान रविवारी दक्षिण सूदानमध्ये एका सरोवरात कोसळून 21 प्रवासी ठार झाले. यादवी युद्धाने विदीर्ण झालेल्या या पूर्व आफ्रिकी देशाच्या मध्य भागात असलेल्या यिरोल शहराजवळ हा अपघात झाला.राजधानी ज्युबा येथून बेबी एअर कंपनीच्या या विमानाने उत्तरेकडे जाण्यासाठी उड्डाण केले होते. १९ प्रवासी बसण्याची क्षमता असलेल्या या विमानात वैमनिकाखेरीज २४ प्रवासी बसले होते. सुदैवाने या अपघातातून तीन प्रवासी जिवंत बचावले. त्यात सहा वर्षांचे एक मूल, एक पुरुष व धर्मादाय मदत संघटनेसाठी काम करणारा एक इटालियन डॉक्टर यांचा समावेश आहे.

Web Title: Plane collapses 21 dead