शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रुग्णालयात तब्बल 20 वर्षांपर्यंत सगळेच पीत राहिले टॉयलेटचं पाणी, कुणालाच कळलं नाही; मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 22:18 IST

या घटनेला खरे तर 8 वर्ष झाली आहेत. मात्र, ही गोष्ट आतापर्यंत दबूनच होती. जपानी न्यूज आउटलेट Yomiuri Shimbun ने संपूर्ण प्रकार प्रसिद्ध केल्यानंतर, आता ही घटना जगासमोर आली आहे.

टोकियो - जापानमधील (Japan) एका रुग्णालयात अजबच प्रकार समोर आला आहे. या रुग्णालयात पाण्याची लाईन चुकून युरिनच्या लाईनला जोडली गेली. यामुळे लोकांना जवळपास तब्बल 20 वर्षांपर्यंत चक्क युरिनचेच पाणी (Toilet Water) प्यावे लागले. याची माहिती जेव्हा लोकांना मिळाली, तेव्हा ते अक्षरशः अवाक झाले.

1993 मध्ये झालीय रुग्णालयाची स्थापना -  Wion या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, जपानी बातम्या आउटलेट Yomiuri Shimbun ने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे. या वृत्तानुसरा, Osaka University च्या मेडिसिन विभागाने 1993 मध्ये हे रुग्णालय बांधले आहे. रुग्णालयाला पाण्यासाठी जवळच्याच एका विहिरीला कनेक्ट करण्यात आले. रुग्णालयाचे बांधकाम सुरू असतानाच या विहिरीचे पाणी अनेक भागांत पोहोचवण्यात आले होते.

पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाइनसोबत जोडलं गेलं टॉयलेट वाटर -वृत्तानुसार, पाण्याची (Drinking Water) कनेक्टिंग लाइन जोडताना प्लंबरकडून चुकून यूरिनची लाईन पिण्याच्या पाण्याच्या लाइनसोबत जोडली गेली. यामुळे लोक अनेक वर्ष यूरिनचे पाणीच (Toilet Water) पीत राहिले. याच बरोबर, त्याच घाणेरड्या पाण्याचा वापर लोक हात धुण्यासाठी, गुळणा करण्यासाठी आणि अगदी अंघोळीसाठीही करत होते. सुरुवातील लोकांना पाण्याची चव काहीशी वेगळी वाटली. पण त्यांनी विचार केला, की कदाचीत विहिरीच्या पाण्याची चवच अशी असेल. यामुळे त्यांनी याकडे फारसे लक्ष दिले नाही. 

2014 मध्ये समोर आली चूक - 2014 मध्ये रुग्णालय प्रशासन परिसरातच डायग्नोसिस एंड ट्रीटमेंट फैसिलिटी सेंटरचे काम करत असताना, व्यवस्थापन पथकाने पाणीपुरवठ्यासाठी रुग्णालयाच्या आवारातील इमारतीची पाहणी केली. तेव्ह अनेक शौचालयांच्या पाण्याचे पाईप चुकून पिण्याच्या पाण्याला जोडण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ही चूक लक्षात येताच, पिण्याच्या पाण्याची चव नेहमीच खराब का लागते आणि आजूबाजूच्या इमारतींमधील पाणी गोड का आहे, हे रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात आले. यानंतर, या पाईप लाईनची दुरुस्ती करण्यात आली.

'कुणालाही हेल्थ प्रॉब्लम नाही' -या घटनेला खरे तर 8 वर्ष झाली आहेत. मात्र, ही गोष्ट आतापर्यंत दबूनच होती. जपानी न्यूज आउटलेट Yomiuri Shimbun ने संपूर्ण प्रकार प्रसिद्ध केल्यानंतर, आता ही घटना जगासमोर आली आहे. हे समजल्यानंतर लोक अवाक झाले आहेत. तसेच विद्यापीठ प्रशासनाने दावा केला आहे, की असे होऊनही कधीच कुणालाही आरोग्याची गंभीर समस्या निर्माण झाल्याचे समोर आले नाही. 

टॅग्स :JapanजपानHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल