शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
2
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
3
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
4
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
5
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
6
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
7
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
8
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
9
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
10
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
11
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
12
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
13
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
14
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
15
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
16
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
17
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
18
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
19
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
20
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!

पाकिस्तानमधील जनता महागाईने बेजार; टोमॅटो 400 पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 10:40 IST

पाकिस्तानमधील सर्वसामान्य जनता महागाईने होरपळत आहे. 

ठळक मुद्देपाकिस्तानमधील सर्वसामान्य जनता महागाईने होरपळत आहे. तब्बल 400 रुपये प्रति किलोने पाकिस्तानात टोमॅटो विकले जात आहेत. सरकारने परिस्थिती सांभाळण्यासाठी इराणवरुन 4,500 टन टोमॅटो आयात करण्याचा परवाना जारी केला आहे.

कराची - पाकिस्तानी नवरीने लग्नात टोमॅटोचे दागिने घातल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पाकिस्तानातील लोक टोमॅटोला सोन्यासारखंच महत्त्व देऊ लागले आहेत. कारण तब्बल 400 रुपये प्रति किलोने पाकिस्तानात टोमॅटो विकले जात आहेत. टोमॅटोच्या वाढलेल्या भावामुळे लोक त्रस्त झाले आहेत. सर्वसामान्य जनता महागाईने होरपळत आहे. 

पाकिस्तानमधील टोमॅटोचे भाव वाढल्यामुळे सरकारने परिस्थिती सांभाळण्यासाठी इराणवरुन 4,500 टन टोमॅटो आयात करण्याचा परवाना जारी केला आहे. मात्र इराणी टोमॅटो बाजारात पोहोचले नसल्याने टोमॅटोच्या किंमतीत वाढ झाली आहे. काही दिवसांपासून टोमॅटो 300 रुपये प्रति किलो विकला जात होता. पण आता या किंमतीत वाढ होऊन 400 रुपये झाल्याची माहिती पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राने दिली आहे. 

व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने इराणवरुन 4500 टन टोमॅटो आयात करण्याचा परवाना जारी केला होता. पण आतापर्यंत फक्त 989 टन टोमॅटो पाकिस्तानात पोहचला आहे. सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यात एका नवरीने टोमॅटोचे दागिने घातले आहेत. हा व्हिडीओ पाकिस्तानच्या पत्रकार नायला इनायत यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना पत्रकार नायला यांनी लिहिले आहे की, 'टोमॅटोचे दागिने...तुम्हाला असं वाटतं का की, तुम्ही तुमच्या जीवनात सगळं काही पाहिलंय...'. हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होत आहे. 

या व्हिडीओमधे दिसणारी नवरी म्हणाली की, तिच्या देशात टोमॅटो आणि पाइन नट्सची किंमत सोन्यासारखी झाली आहे. हेच कारण आहे की, तिने सोन्याऐवजी टोमॅटोचे दागिने घातले आहेत. ती म्हणाली की, तिच्या भावाने तिला पाइन नट्स गिफ्ट दिले आहेत. तर तिच्या आई-वडिलांनी तीन सूटकेस भरून टोमॅटो दिले आहेत. हजारो लोकांनी आतापर्यंत हा व्हिडीओ पाहिला असून त्यावर मजेदार कमेंटही बघायला मिळत आहेत.

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतासोबत व्यापार संबंध तोडले होते. मात्र त्यांचा हा निर्णय पाकिस्तानच्या अंगलट आल्याचं दिसून आलं आहे. व्यापारावर बंदी घालणं चांगलंच महागात पडत आहे. पाकिस्तानमधील सर्वसामान्य जनता महागाईने होरपळत आहे. भारताकडून स्वस्तात कापूस खरेदी पाकिस्तानने स्वतः हून बंद केली आहे. त्यामुळे कापसाची आयात करण्यासाठी त्यांना आता जास्त पैसे मोजावे लागत आहेत. तसेच औषधे आणि वैद्यकीय उपकरणांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. पाकिस्तानमधील 'द न्यूज'ने दिलेल्या माहितीनुसार, कापूस उत्पादनात घट झाली आहे. पाकिस्तानला स्वतः ची गरज पूर्ण करण्यासाठी परदेशातून महाग कापूस आयात करावा लागू शकतो. तसेच पाकिस्तान कॉटन जिनर्स असोसिएशनच्या (पीसीजीए) आकडेवारीचा हवाला देत सूत उत्पादनात 26.54 टक्क्यांची घसरण झाल्याचा उल्लेखही यामध्ये करण्यात आला होता. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान