शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 15:30 IST

Papua New Guinea landslide : पापुआ न्यू गिनी देशातील काओकलाम गावात झोपेत असलेल्या लोकांवर काळाने घाला घातला.

Papua New Guinea landslide : पापुआ न्यू गिनी देशात झालेल्या भूस्खलनामुळे हाहाकार माजला आहे. पापुआ न्यू गिनीच्या राजधानी मोरेस्बीपासून 600 किमी अंतरावर असलेल्या काओकलाम गावात दोन दिवसांपूर्वी सकाळी 3 वाजता भूस्खलन झाले होते. या भूस्खलनात मोठ्या प्रमाणात लोक ढिगाऱ्याखाली गाडली गेली. आतापर्यंत 2 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. यापूर्वी ही संख्या 670 असल्याचे सांगितले जात होते, पण त्यात सातत्याने वाढ होत आहे. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव कर्मचारी सातत्याने प्रयत्न करत आहेत.

भूस्खलनाचे प्रमाण आता वाढत आहेमीडिया रिपोर्ट्सनुसार, तेथील नॅशनल डिझास्टर सेंटरचे कार्यवाहक संचालक लुसेट लासो माना यांनी संयुक्त राष्ट्राला लिहिलेल्या पत्रात म्हटले की, भूस्खलनामुळे 2,000 हून अधिक लोक जिवंत गाडले गेले असून, अनेक इमारती आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भूस्खलनाचा देशाच्या विकासावर मोठा परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे, भूस्खलन संथ गतीने होत असल्याने परिस्थिती अस्थिर बनली आहे. दरड कोसळल्यामुळे अनेक भागांना जोडणारे रस्तेही बंद झाले आहेत. 

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना शोधणे आव्हानात्मक सिडनी युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ सिव्हिल इंजिनीअरिंगचे सहयोगी प्राध्यापक पियरे रोगनन म्हणाले की, भूस्खलनानंतर लोकांना शोधणे खूप मोठे आव्हान आहे. भूस्खलनामुळे कोसळलेल्या इमारती आणि लोक अनेक मीटर खाली दबले गेले असतील. दरम्यान, भूस्खलन कशामुळे झाले, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतू ॲडलेड विद्यापीठातील भूगर्भशास्त्राचे प्राध्यापक ॲलन कॉलिन्स यांनी सांगितले की, हा अतिशय पावसाळी भाग होता, त्यामुळे येथे असे घडले असावे. 

टॅग्स :landslidesभूस्खलनInternationalआंतरराष्ट्रीयAccidentअपघातDeathमृत्यू