शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

Afghanistan: तालिबानविरुद्ध लढण्यास ‘पंजशीर’चे सिंह शस्त्रसज्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 05:56 IST

आतापर्यंत अजेय आहे हा प्रांत, तालिबानही घाबरतो येथील टोळ्यांना

काबुल : अमेरिकेने सैन्य माघारीला सुरुवात केल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानचा ताबा घेतला. माजी राष्ट्रपती अशरफ गनी यांनी भीतीने पलायन केले. एवढी दहशत असलेला तालिबान मात्र एका ठिकाणी घुसायला घाबरतो. हा भाग म्हणजे पंजशीर खोरे. अफगाणिस्तानातील ३४ राज्यांपैकी केवळ हे एकच राज्य अद्याप  तालिबानला काबीज करता आलेले नाही. यामागील कारण म्हणजे तालिबानचा कडवा प्रतिकार करणारे ताजिक समुदायाचे लोक. त्यांनी तालिबानचे प्रत्येक प्रयत्न उधळून लावले आहेत.

पंजशीर प्रांतामध्ये पंजशीर खोरे आहे. परवान प्रांताची विभागणी करून एप्रिल २००४  मध्ये हा भाग वेगळा करण्यात आला होता. पंजशीरचा अर्थ म्हणजे “पाच सिंहांचे खोरे”. काबूलपासून १५० किलोमीटर अंतरावर हा प्रांत आहे. या खोऱ्यातून पंजशीर नदी वाहते. अतिशय निसर्गरम्य असा हा परिसर आहे. तालिबानने हा प्रांत ताब्यात घेण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न अपयशी ठरला आहे. अमेरिकेकडून बॉम्बचा वर्षाव होत असतानाही पंजशीर प्रांत सुरक्षित राहिला होता. 

सर्व कट्टर लढवय्ये...तालिबानविरोधात लढण्यासाठी उत्तरी आघाडीला भारतासह ईराण, रशिया, तुर्की, ताजिकीस्तान, उझबेकीस्तान आणि तुर्कमेनिस्तानची मदत मिळत होती. या भागात ताजिक समुदायासह हजारा समुदायाचेही नागरिक मोठ्या प्रमाणावर आहेत. या समुदायाला चंगेज खानचे वंशज म्हणून ओळखले जाते. याशिवाय नूरीस्तानी आणि पशई यासारख्या समुदायाचे लोकही राहतात. हे सर्व कट्टर लढवय्ये आहेत. गोरिल्ला युद्धात त्यांचे प्राविण्य आहे. तसेच पर्वतरांगांचा भाग असल्यामुळे त्यांना पराभूत करणे अतिशय कठीण आहे. उत्तरी आघाडीमुळेच या समुदायांमध्ये तालिबानविरोधात लढण्याचे बळ प्राप्त झाले आहे. 

तो तान्हुला अखेर पित्याच्या ताब्यात; आईने सोपविले होते सैन्याकडेकाबुल : अफगाण नागरिकांमध्ये तालिबानच्या जुलमी राजवटीची प्रचंड दहशत आहे. त्याचे एक चित्र दोन दिवसांपूर्वी संपूर्ण जगाने पाहिले होते. एका मातेने चक्क आपल्या तान्हुल्या बाळाला अमेरिकन सैनिकांच्या स्वाधीन करून तालिबान्यांपासून त्याची सुटका करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. ते मूल अखेर त्याच्या वडिलांना सोपविण्यात आल्याची माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे प्रवक्ते जॉन किरबी यांनी दिली आहे. 

बरादर आगामी राष्ट्राध्यक्ष? nसरकार स्थापनेसंदर्भात जिहादी व राजकीय नेत्यांशी चर्चा करण्याकरिता तालिबान संघटनेचा सहसंस्थापक मुल्ला अब्दुल घनी बरादर हा काबुल येथे शनिवारी पोहोचला आहे. तो या देशाचा राष्ट्राध्यक्ष बनण्याची शक्यता वर्तविली जात आहे.nयाआधी शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका व अफगाणिस्तानमधील विविध नेत्यांशी बरादरने चर्चा केली होती. 

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तान