कान महोत्सवात पामेलाची धक्कादायक वाच्यता

By Admin | Updated: May 20, 2014 00:04 IST2014-05-20T00:04:52+5:302014-05-20T00:04:52+5:30

प्रसिद्ध अभिनेत्री, मॉडेल, टीव्ही निर्माती व लेखिका पामेला अँडरसनने, कान महोत्सवात आपल्यावरील अत्याचारांना वाचा फोडली असून, वयाच्या सहाव्या वर्षी आपले लैंगिक शोषण झाले

Pamela's shocking readiness at the Cannes Festival | कान महोत्सवात पामेलाची धक्कादायक वाच्यता

कान महोत्सवात पामेलाची धक्कादायक वाच्यता

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री, मॉडेल, टीव्ही निर्माती व लेखिका पामेला अँडरसनने, कान महोत्सवात आपल्यावरील अत्याचारांना वाचा फोडली असून, वयाच्या सहाव्या वर्षी आपले लैंगिक शोषण झाले, तर १२ व्या वर्षी आपल्याला सामूहिक बलात्काराला बळी पडावे लागले, असे तिने अँडरसन फौंडेशनच्या एका कार्यक्रमात सांगितले. त्यामुळे हॉलीवूडमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. पामेलाने प्रथमच अनेक खाजगी गोष्टींची वाच्यता केली. वयाच्या सहाव्या वर्षीच आपल्याला लैंगिक शोषणाला बळी पडावे लागले. आपल्याला सांभाळणार्‍या बाईनेच हे दुष्कृत्य केले, असे तिने सांगितले. लहानपणी आपल्याला अनेक यातना सहन कराव्या लागल्या. वयाच्या १२ व्या वर्षी बलात्कार तर नंतर सामूहिक बलात्कारालाही सामोरे जावे लागले, असे तिने सांगितले. रियलिटी शो बिग बॉसमध्येही पामेला सहभागी झाली होती. माझे वडील मद्यपी होते, तर आई दोन नोकर्‍या करीत होती. त्यामुळे मला कधीच सुरक्षित घर लाभू शकले नाही. प्राणी हेच माझे खरे मित्र असल्याचे तिने सांगितले. (वृत्तसंस्था)

Web Title: Pamela's shocking readiness at the Cannes Festival