शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

पॅलेस्टिनला ३ देशांनी मानले ‘देश’; इस्रायल जगात आणखी एकाकी, तिन्ही देशांतून राजदूत माघारी बोलावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 08:38 IST

आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचे (आयसीसी) मुख्य वकिलाने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांचे संरक्षण मंत्री यांच्यासाठी अटक वॉरंट जारी करण्याची मागणी लावून धरली आहे.

तेल अवीव (इस्रायल) : नॉर्वे, आयर्लंड आणि स्पेन या युरोपातील तिन्ही देशांनी गाझामधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक ऐतिहासिक आणि प्रतीकात्मक पाऊल उचलत बुधवारी देश म्हणून पॅलेस्टिनला मान्यता दिल्याचे जाहीर केले. त्यामुळे गाझामधील हमास विरुद्ध सात महिन्यांहून अधिक काळापासून युद्ध करणारा इस्रायल जगात आणखी एकाकी पडला. दरम्यान, इस्रायलने तिन्ही देशांतील आपल्या राजदूतांना परत बोलावले आणि त्यांच्या दूतांना समन्स पाठवले. आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचे (आयसीसी) मुख्य वकिलाने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांचे संरक्षण मंत्री यांच्यासाठी अटक वॉरंट जारी करण्याची मागणी लावून धरली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय (आयसीजे) इस्रायलवर नरसंहाराचे आरोप लावण्याचा विचार करत असताना तिन्ही देशांनी पॅलिस्टिनला देश म्हणून मान्यता दिली. नरसंहाराचे आरोप इस्रायलने नेहमीच फेटाळले आहेत. 

पॅलेस्टिनकडून स्वागत, इस्रायलकडून विरोधपूर्व जेरुसलेम, वेस्ट बँक आणि गाझा पट्टी यावर १९६७ च्या मध्यपूर्व युद्धात इस्रायलने ताबा मिळविल्यापासून देश म्हणून मान्यता मिळविण्याची वाट पाहणाऱ्या पॅलेस्टिनने तीन देशांनी मान्यता दिल्याचे स्वागत केले. ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यासाठी युरोपमधील देश हमासला बक्षीस देत आहे, असा त्रागा इस्रायलने व्यक्त केला आहे. पॅलेस्टिनला देश म्हणून मान्यता देण्यास विरोध करणारे नेतन्याहू यांचे सरकार म्हणते की, हा संघर्ष केवळ थेट वाटाघाटीद्वारे सोडवला जाऊ शकतो, ज्या १५ वर्षांपासून थांबल्या आहेत. 

तणाव वाढण्याची शक्यताnआपली बाजू रेटण्यासाठी इस्रायलचे कट्टर उजव्या विचारसरणीचे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इटामार बेन-गवीर यांनी बुधवारी जेरुसलेममधील ज्यू आणि मुस्लिमांसाठी पवित्र असलेल्या पवित्र स्थळाला भेट दिली, ज्यामुळे संपूर्ण प्रदेशात तणाव वाढू शकतो. nबेन-गवीर म्हणाले की, ही भेट तीन युरोपीय देशांच्या हालचालींना प्रत्युत्तर आहे. आम्ही पॅलेस्टिनला देशाचा दर्जा देण्याबद्दल कोणतेही विधान मान्य करणार नाही. 

२८ मे रोजी औपचारिक मान्यता मिळणार२८ मे रोजी पॅलेस्टिनला देश म्हणून औपचारिक मान्यता मिळणार असून १९३ देशांच्या संयुक्त राष्ट्रांतील सुमारे १४० देशांनी मान्यता दिलेली आहे. त्यात आता या तीन देशांचा समावेश होणार आहे. अमेरिका आणि ब्रिटनने इतरांसह इस्रायलच्या बाजूने स्वतंत्र पॅलेस्टिनी राज्याच्या कल्पनेचे समर्थन केले आहे, परंतु हा प्रश्न वाटाघाटीद्वारे सोडवला जावा, असे त्यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षPalestineपॅलेस्टाइन