शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
2
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
3
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
4
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
5
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
6
भाजपासोबत जाण्याचा घटनाक्रम नेमका कसा होता?; सुनील तटकरेंनी २०१४ पासूनचं सगळं सांगितलं
7
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
8
Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
9
बीडमध्ये बोगस मतदान, काही ठिकाणी फेरमतदान घ्या, बजरंग सोनावणे यांनी केली मागणी   
10
RRR, 'आदिपुरुष'पेक्षा महागडा आहे नितेश तिवारीचा 'रामायण', बजेटचा आकडा पाहून व्हाल हैराण
11
Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर
12
राहुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना संधींचा काळ, लाभाचे शुभ योग; सुख-समृद्धीत वाढ, भाग्याची साथ!
13
मी कुठलंही वचन दिलं नव्हतं, उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत; अमित शाहांनी पुन्हा फटकारलं
14
IPO असावा तर असा! ३८६% प्रीमिअमवर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी ₹७५ वरुन पोहोचला ₹३६५वर
15
Ganga Saptami 2024: गंगेत स्नान केल्याने खरोखरंच पाप धुतले जाते का? गंगासप्तमिनीत्त वाचा गंगा स्नानाचे महत्त्व!
16
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
17
Ganga Saptami 2024: गंगा सप्तमीला का केले जाते पितृतर्पण? ते कसे करायचे व त्यामुळे काय फळ मिळते? वाचा!
18
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
19
एका अटीवर सलमान खानला माफ करु शकतो बिष्णोई समाज, वाचा काय आहे नेमका तोडगा
20
"वारसा चालवण्यासाठी मुल जन्माला घालण्यात अर्थ नाही, जर..," पाहा काय म्हणाले Zerodhaचे Nikhil Kamath

अमेरिकेचा पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा, अन्यथा अमेरिकन सैन्य घुसेल पाकिस्तानात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 5:38 PM

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन बुधवारी भारतात आले होते.  या दौ-यादरम्यान त्यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली.

ठळक मुद्देकिस्तानने त्यांच्या भूमीवरील दहशतवादाचे नेटवर्क मोडून काढावे अन्यथा आम्ही वेगळया मार्गाने जाऊ.

वॉशिंग्टन - पाकिस्तानने आपल्या भूमीवरुन चालणा-या दहशतवादाविरोधात ठोस कारवाई करावी. अन्यथा अमेरिका आपल्या पद्धतीने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा बीमोड करेल असा स्पष्ट संदेश अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानला दिला आहे. पाकिस्तानने त्यांच्या भूमीवरील दहशतवादी संघटनांची सुरक्षित आश्रयस्थळे नष्ट केलीच पाहिजेत असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांनी पाकिस्तानला सांगितले आहे. 

रेक्स टिलरसन यांनी नुकताच अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारताचा दौरा केला. पाकिस्तानने त्यांच्या भूमीवरील दहशतवादाचे नेटवर्क मोडून काढावे अन्यथा आम्ही वेगळया मार्गाने जाऊ आणि आमच्या पद्धतीने कारवाई करु असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हीथर नॉरेट म्हणाले. आम्ही आमच्या अपेक्षा अनेकदा पाकिस्तानला सांगितल्या आहेत. आता त्यांनी ठोस कारवाई केली पाहिजे असे हीथर म्हणाले. 

सुषमा स्वराजांसोबत झालेल्या बैठकीत पाकिस्तानातील दहशतवादावर चर्चा

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन बुधवारी भारतात आले होते.  या दौ-यादरम्यान त्यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी टिलरसन यांच्यासमोर पाकिस्तानातील दहशतवादाचा मुद्दा मांडला.  टिलरसन यांच्या भारत दौ-याच्या अजेंड्यामध्ये भारत-अमेरिकेतील धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याशिवाय आशिया-प्रशांत क्षेत्रात चीनचा वाढत्या प्रभावाला विरोध दर्शवण्याच्या प्रयत्नांचाही समावेश आहे. 

दरम्यान, भारतासोबतचे संबंध अमेरिकेसाठी किती महत्त्वपूर्ण आहेत याची झलक टिलरसन यांचा भारत दौरा सुरू होण्यापूर्वीच पाहायला मिळाली. पाकिस्तानच्या भूमीतून भारताविरोधात होणा-या दहशतवादी कारवाया न थांबल्यानं नाराजी जाहिररित्या व्यक्त केली.दक्षिण आशियातील आपला पहिला दौरा सुरू करण्यापूर्वी टिलरसन यांनी आक्रमक धोरणांवरुन चीनवर टीका केली. तर दुसरीकडे, दहशतवादी कारवाया रोखण्यात अपयशी ठरलेल्या पाकिस्तानलाही खडेबोल सुनावले. पाकिस्तानातील सक्रिय दहशतवादी कारवायांचा खात्मा करण्यासाठी  आणखी प्रयत्न करावे लागतील, असा पुनरुच्चार करत टिलरसन यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावले. 

टॅग्स :Americaअमेरिका