शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

पाकिस्तानचे इराणला प्रत्युत्तर; हल्ल्यात ९ ठार, तणाव वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 06:21 IST

सीमावर्ती सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात कथित अतिरेकी तळांवर हल्ल्यांचा दावा

इस्लामाबाद : इराणनेपाकिस्तानमध्ये घुसून अतिरेक्यांविरोधात केलेल्या कारवाईनंतर पाकिस्ताननेही गुरुवारी जशास तसे प्रत्युत्तर दिले. इराणच्या सीमावर्ती सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात अतिरेक्यांच्या कथित तळांवर लष्करी हल्ले केले. त्यात नऊ जण ठार झाल्याने दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे. 

पाकिस्तानने तेहरानमधून आपल्या दूताला परत बोलावल्यानंतर आणि सर्व नियोजित उच्चस्तरीय निलंबित केल्याच्या एका दिवसानंतर गुरुवारी ही कारवाई केली. गुरुवारी सकाळी पाकिस्तानने इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातील दहशतवादी अड्ड्यांवर अचूक लष्करी हल्ले केले. 

गुप्त माहितीवर आधारित या मोहिमेत अनेक दहशतवादी मारले गेल्याचा दावा पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने गुरुवारी सकाळी केला. या मोहिमेला पाकिस्तानने ‘मार्ग बार सरमचार’ असे सांकेतिक नाव दिले होते. पर्शियन भाषेत, ‘मार्ग बार’ म्हणजे ‘मृत्यू’ तर बलुच भाषेत ‘सरमचार’ म्हणजे ‘गनिम’ होय.

...अन् चीनने दिला मध्यस्थीचा प्रस्तावचीनने गुरुवारी पाकिस्तान आणि इराण यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून एकमेकांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर तणाव कमी करण्यासाठी रचनात्मक भूमिका बजावण्यासाठी मध्यस्थीचा प्रस्ताव दिला आहे. दोन्ही देशांनी संयम आणि शांतता बाळगून तणाव टाळावा, असे आवाहन चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी केला.

काळजीवाहू पंतप्रधान दावोसहून माघारीवर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला उपस्थित राहण्यासाठी दावोसमध्ये असलेले काळजीवाहू पंतप्रधान अन्वारुल-हक-ककर आपला दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतण्यासाठी निघाले आहेत. परराष्ट्र मंत्री जलील अब्बास जिलानी हेही युगांडा दौऱ्यावरून तातडीने माघारी येण्यासाठी रवाना झाले आहेत.

हा दोन्ही देशांतील अंतर्गत विषय : भारतइराणचा पाकिस्तानवरील क्षेपणास्त्र हल्ला हा त्या दोन राष्ट्रांतील अंतर्गत चिंतेचा विषय आहे. भारताने नेहमीच दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुतेची भूमिका घेतली आहे. स्वसंरक्षणासाठी देशाने केलेली कृती आम्हाला समजते, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

घातक ड्रोन, शस्त्रांचे हल्लेपाकिस्तानी सैन्याच्या प्रसिद्धी शाखेने एका निवेदनात म्हटले आहे की, घातक ड्रोन, रॉकेट, युद्धसामग्री आणि शस्त्रे वापरून अचूक हल्ले केले गेले. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) आणि बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट (बीएलएफ) या दहशतवादी संघटनांच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. या दोन्ही गटांनी यापूर्वी पाकिस्तानमध्ये अनेक हल्ले केले आहेत.

दोन्ही शेजारी बंधू देश आहेत आणि त्यांनी संवाद आणि परस्पर सल्लामसलत करून समस्या सोडवल्या पाहिजेत. तथापि, पाकिस्तान आपल्या राष्ट्रीय सुरक्षेशी आणि प्रादेशिक अखंडतेशी तडजोड करणार नाही.    - आरिफ अल्वी,     अध्यक्ष, पाकिस्तान

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIranइराण