शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरचा म्हणून पाकने दाखवला पॅलेस्टीनचा फोटो, उत्तर देण्याच्या नादात नाचक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 03:26 IST

भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत शुक्रवारच्या भाषणात दहशतवादावरून वाभाडे काढल्यानंतर, जशास तसे उत्तर देण्याच्या नादात पाकिस्तानने रविवारी स्वत:ची चांगलीच फजिती करून घेतली.

न्यूयॉर्क : भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत शुक्रवारच्या भाषणात दहशतवादावरून वाभाडे काढल्यानंतर, जशास तसे उत्तर देण्याच्या नादात पाकिस्तानने रविवारी स्वत:ची चांगलीच फजिती करून घेतली. काश्मीरमध्ये कसे अत्याचार होतात हे दाखवण्याचा खोटा प्रयत्न करताना पाकिस्तानने गाझा हल्ल्याचा फोटो दाखवला असून, त्यामुळे जगभरात नाचक्की झाली आहे.पाकिस्तानच्या राष्ट्रसंघातील स्थायी प्रतिनिधी मलिहा लोधी, उत्तर देण्याचा अधिकार बजावत, आमसभेपुढे उभ्या राहिल्या व स्वयंनिर्णयाचा ‘न्याय्य’ हक्क मागणाºया कश्मिरी जनतेवर भारत सरकार लष्कराकरवी कसे अनन्वित अत्याचारकरीत आहे, याचे खोटेनाटे आरोप करत त्यांनी एक फोटो दाखविला. सुरक्षादलांनी पेलेट गनचा मारा केल्याने एका काश्मिरी युवतीच्या चेहºयाची कशीचाळण झाली, हे जगासमोर आणण्यासाठी लोधी यांनी फोटो दाखविला होता; परंतु प्रत्यक्षात हा फोटो काश्मिरी युवतीचा नसल्याचे लगेच स्पष्ट झाले.स्वराज यांनी त्यांच्या भाषणात पाकिस्तानला ‘दहशतवादाची निर्यात करणारा प्रमुख कारखाना’ असेसंबोधले होते. याउलट भारतीय लोकशाहीचा चेहरा किती क्रूर आहे, हे दाखविण्यासाठी पाकिस्तानच्या प्रतिनिधीबार्इंनी हा फोटो फडकावला होता. प्रत्यक्षात हा फोटो गाझा पट्ट्यात राहणाºया रवया अबू जोम या १७ वर्षांच्या पॅलेस्टिनी युवतीचा होता.सन २०१४ मध्ये इस्रायलच्या लष्करी विमानांनी गाझा पट्ट्यातील रहिवासी इमारतींवर बॉम्बहल्ले केले होते. त्यापैकी एका बॉम्बने रवयाचे घर उद््ध्वस्त झाले होते व उडालेल्या काचा व अन्य वस्तूंनी तिच्या चेहºयावर झालेल्या जखमांचा तो फोटो होता.हे छायाचित्र भारतातील नसून गाझा पट्ट्यात २०१४मध्ये इस्रायलकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात जखमी झालेल्या १७ वर्षीय रवया अबू जोम हिचे आहे.

टॅग्स :TerrorismदहशतवादIndiaभारतPakistanपाकिस्तान