पाकिस्तानची परफेक्ट नक्कल, बनवून टाकला आमीरचा 'दंगल'
By Admin | Updated: February 24, 2017 13:10 IST2017-02-24T11:25:11+5:302017-02-24T13:10:28+5:30
लाहोरमधील थिएटर ग्रुप 'तमाशील'ने आमीरच्या दंगल चित्रपटाचं वेड पाहून हा चित्रपट तयार केला असून लोकांची अक्षरक्ष: झुंबड उडाली आहे

पाकिस्तानची परफेक्ट नक्कल, बनवून टाकला आमीरचा 'दंगल'
>ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 24 - पाकिस्तानने केलेल्या उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी कलाकारांवर घातलेल्या बंदीमुळे चिडलेल्या पाकिस्तानने बॉलिवूड चित्रपटांवर बंदी घातली होती. त्यामुळेच पाकिस्तानमधील आमीर खानच्या चाहत्यांनी इच्छा असूनही दंगल चित्रपट पाहायला मिळाला नाही. मात्र पाकिस्तानमधील बॉलिवूड चित्रपटांचं वेड काही कमी झालेलं नाही. म्हणूनच की काय सरळ मार्गाने काम होत नसलेलं पाहून पाकिस्तानमध्ये दंगल चित्रपट तयार करण्यात आला आहे.
लाहोरमधील थिएटर ग्रुप 'तमाशील'ने आमीरच्या दंगल चित्रपटाचं वेड पाहून हा चित्रपट तयार केला असून लोकांची अक्षरक्ष: झुंबड उडाली आहे. थिएटर ग्रुपमधील सर्व कलाकार यामध्ये काम करत असून काहीच नसण्यापेक्षा काहीतरी असा हिशेबच लोकांनी लावून टाकला आहे. ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार अभिनेता नसीम विकी याने आमीर खानची म्हणजेच महावीर फोगाट यांची भूमिका निभावली आहे.
पाकिस्तानने अशाप्रकारे बॉलिवूड चित्रपटांची नक्कल करणं हे काही नवीन नसून याआधाही असे प्रयोग झाले आहेत. याअगोदर पाकिस्तानमध्ये पीके', 'देवदास' आणि 'तेरे नाम' सारख्या चित्रपटांची नक्कल करण्यात आली असून लोकांनाही ते प्रचंड आवडले आहेत.