पाकचं काश्मीरसाठी नवं गाणं, भारताच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार
By Admin | Updated: February 5, 2017 13:38 IST2017-02-05T13:38:55+5:302017-02-05T13:38:55+5:30
पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरचा राग आळवला आहे.

पाकचं काश्मीरसाठी नवं गाणं, भारताच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 5 - पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरचा राग आळवला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पाकिस्तान काश्मिरी जनतेच्या पाठीशी असल्याचं म्हटलं आहे. एवढ्यावर न थांबता पाकिस्तानी लष्कर आणि सरकारनं काश्मीर मुद्द्यावरून भारतावर टीका करण्यात सुरुवात केली आहे. तसेच काश्मिरी जनतेची सहानुभूती आणि पाठिंबा मिळवण्यासाठी एका गाण्याचीही रचना केली आहे. त्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
पाकिस्तानमध्ये दरवर्षी काश्मीर प्रश्न जिवंत ठेवण्यासाठी 5 फेब्रुवारी हा काश्मीर दिन म्हणून पाळला जातो. या संधीचा फायदा घेत पाकिस्तानी लष्करानं या गाण्याचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर टाकला आहे. त्यानंतर पाकिस्तान नेहमीच काश्मिरी जनतेच्या पाठीशी असून, काश्मीरला वादग्रस्त भाग म्हणून जाहीर करावे, अशी मागणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केली आहे.
शनिवारी रात्री पाकिस्तानी सैन्याने काश्मीर दिनाचं औचित्य साधून व्हिडीओ प्रकाशित केला. या गाण्यामध्ये भारताने काश्मीर सोडावे अशी मागणी केली असून, भारताच्या जखमेवर हा मीठ चोळण्याचा प्रकार पाकिस्ताननं चालवला आहे. मात्र भारताकडून अद्याप कोणतंही प्रत्युत्तर देण्यात आलं नाही.
5 Feb...Solidarity with Kashmiris. Atrocities in Held Kashmir must stop. Kashmiris be given their right of self determination=UN Resolutions pic.twitter.com/b3VTJI89o4
— Maj Gen Asif Ghafoor (@OfficialDGISPR) February 4, 2017