शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
3
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
4
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
5
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
7
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
8
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
9
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
10
तुमच्या गृहकर्जाचा हप्ता ४००० रुपयांनी होईल स्वस्त; बँक बदला आणि लाखो रुपये वाचवा! ही आहे पद्धत
11
"मी कितीही स्पष्टीकरण दिलं तरी...", ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चनने सोडलं मौन
12
ढगफुटी झाली आणि पूर आला; गाडी नदीत अडकता ड्रायव्हर चढला टपावर, पुढे काय झालं?
13
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
14
Ashadh Ritual 2025: आषाढात लेकीला माहेरी बोलावण्याची पूर्वापार प्रथा, केला जातो 'असा' कौतुक सोहळा!
15
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
16
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
17
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
18
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
19
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
20
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार

भगतसिंह यांना न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा?, 86 वर्षानंतर पाकिस्तानी वकिल देणार लढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 21:42 IST

भगतसिंह यांना ब्रिटिश सरकारच्या काळात 23 मार्च 1931 रोजी वयाच्या 23 व्या वर्षी लाहोर येथील तुरुंगात फाशीची शिक्षा देण्यात आली होती. यासाठी त्यांच्यावर ब्रिटिश सरकारविरोधात कट-कारस्थान रचल्याचा आणि भगतसिंह, सुखदेव व राजगुरू यांनी मिळून ब्रिटिश अधिकारी जॉन पी. सँडर्स याची हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

लाहोर, दि. 13 - ब्रिटीश पोलीस अधिकाऱ्याची हत्या केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवत फाशी देण्यात आलेल्या महान क्रांतिकारक भगतसिंह यांच्याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. भगतसिंह यांच्यावर ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येचा आरोप लावण्यात आला होता त्या अधिकाऱ्याची हत्या त्यांनी केली नव्हती, असा दावा पाकिस्तानमधील एका वकिलाने केला आहे. इम्तियाज रशीद कुरेशी असे या पाकिस्तानी वकिलाचे नाव आहे.

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकाला न्याय मिळवून देण्यासाठी या वकिलाने पाकिस्तानच्या उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. त्यांनी यासंदर्भात गेल्या वर्षीही याचिका दाखल केली होती. पण त्यावर अद्याप काहीही कार्यवाही झाली नव्हती. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यांत पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांना लाहोर उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाने विनंती करीत अ‍ॅड. कुरेशी यांच्या याचिकेवर सुनावणीसाठी खंडपीठातील न्यायाधीशांची संख्या वाढवावी अशी विनंती केली होती.

भारताचे तुकडे होऊ नये यासाठी भगतसिंह लढत होते, असे अ‍ॅड. कुरेशी यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. भगतसिंह यांची या आरोपातून सरकारचे पुनरावलोकन आणि सुव्यवस्थेचे सिद्धांत वापरून सुटका करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी आपल्या याचिकेत केली आहे. त्याचबरोबर भगतसिंह यांचा देशपातळीवरील पुरस्काराने गौरव करण्यात यावा, असेही त्यांनी याचिकेत म्हटले आहे.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी क्रांतिकारक भगतसिंह यांना 86 वर्षांनंतर न्याय मिळवून देण्यासाठी इम्तियाज रशीद कुरेशी लढा देणार आहेत. यासंदर्भात सोमवारी न्यायालयात त्यांनी नव्याने याचिका दाखल केली आहे. अ‍ॅड. इम्तियाज रशीद कुरेशी सध्या लाहोरमधील भगतसिंह मेमोरिअल फाऊंडेशन चालवतात.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानCourtन्यायालयadvocateवकिल