शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

२६/११ हल्ल्यात पाकचाच हात, नवाज शरीफ यांनी प्रथमच दिली जाहीर कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 01:30 IST

मुंबईवरील २६/११चा दहशतवादी हल्ला पाकिस्तानमध्ये अनिर्बंधपणे सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांनीच घडवून आणला

इस्लामाबाद : मुंबईवरील २६/११चा दहशतवादी हल्ला पाकिस्तानमध्ये अनिर्बंधपणे सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांनीच घडवून आणला, अशी जाहीर कबुली पाकिस्तानचे माजी पंतप्रधान मोहम्मद नवाज शरीफ यांनी सत्ता गेल्यानंतर प्रथमच दिली आहे. या हल्ल्याच्या संदर्भात पूर्णपणे काखा वर करण्याची पाकिस्तानची अधिकृत भूमिका किती धादांत खोटेपणाची आहे, हेच शरीफ यांच्या कबुलीने स्पष्ट होते.‘डॉन’ या पाकिस्तानमधील अग्रगण्य वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात शरीफ यांनी ही अप्रत्यक्ष कबुली दिली. मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद आणि मौलाना मसूद अझर यांच्या अनुक्रमे जमात-उद-दावा व जैश-ई-मोहम्मद या दहशतवादी संघटनांचे प्रत्यक्ष नामोल्लेख करता शरीफ म्हणाले, पाकिस्तानात दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. हवेतर त्यांना शासनबाह्य कृती करणारे (नॉन स्टेज अ‍ॅक्टर्स) म्हणा. पण अशा मंडळींना सीमा ओलांडून मुंबईला जाऊन १५०हून अधिक लोकांचा बळी घेण्यास मोकळीक दिली जाते हे सर्वस्वी चुकीचे आहे, अस्वीकार्य आहे. शेजारी देशांत जाऊन असा हिंसाचार करणाऱ्यांना पाकिस्तान सरकारचीही छुपी साथ असल्याचे सूचित करत शरीफ यांनी मुंबई हल्ल्याशी संबंधित खटला अद्याप पूर्ण का झाला नाही, असाही सवाल केला. पाकिस्तानच्या या धोरणाचा जगभरात निषेध होत आहे. पाकिस्तान स्वत:च्याच वागण्याने जगात एकाकी पडला आहे. आज जागतिक राजकारणात अफगाणिस्तानवर लोक विश्वास ठेवतात; पण पाकिस्तानवर नाही, असेही ते म्हणाले.मुंबईवर हल्ला झाला तेव्हा पाकिस्तान पीपल्स पार्टीचे युसूफ रझा गिलानी पाकिस्तानचे पंतप्रधान होते. त्यानंतर शरीफ सत्तेवर आले; पण भारताविरुद्ध दहशतवादाचा वापर करण्याचे पाकिस्तानचे धोरण कायम राहिले. आताही शरीफ यांच्याच पक्षाकडे पाकिस्तानची सत्ता आहे. परंतु व्यक्तिश: त्यांना कोणत्याही सरकारी पदावर राहण्यास किंवा पक्षाचे अध्यक्ष राहण्यासही अपात्र ठरविले आहे.न्यायसंस्था आणि लष्कर यांच्या सक्रिय हस्तक्षेपास आक्षेप घेत शरीफ म्हणाले, दोन-तीन समांतर सरकारे काम करणार असतील तर देशाचा कारभार चालू शकत नाही. हे थांबायला हवे. देशात फक्त एकच, राज्यघटनेनुसार स्थापन झालेले सरकार असू शकते.