शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानमध्ये हाफीज सईद आणि इम्रान खानचे मंत्री एकाच मंचावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 09:18 IST

पाकिस्तानचा दहशतवादाला आश्रय देणारा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. रविवारी इस्लामाबादमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात कुख्यात दहशतवादी हाफीज सईद आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री एकाच मंचावर आल्याचे चित्र पाहायला मिळाले.  

इस्लामाबाद - पाकिस्तानचा दहशतवादाला आश्रय देणारा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. रविवारी इस्लामाबादमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात कुख्यात दहशतवादी हाफीज सईद आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री एकाच मंचावर आल्याचे चित्र पाहायला मिळाले.  इस्लामाबादमध्ये दिफा-ए-पाकिस्तान कौन्सिलने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये 26/11 च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी हाफीज सईद याला मुख्य अतिथी म्हणून बोलावण्यात आले होते. या कार्यक्रमात इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले नूर उल हक कादरी हे हाफीज सईदच्या अगदी शेजारी बसलेले दिसून आले.  कादरी हे इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळात धार्मिक बाबींचे मंत्री आहेत. कार्यक्रमाची आयोजक असलेली दिफा ए पाकिस्तान कौन्सिल ही पाकिस्तानमधील 40 राजकीय पक्षांचा समूह आहे. या कार्यक्रमात हाफीज सईदने भाषणसुद्धा केले होते. तसेच येथे काश्मीर संदर्भात चर्चाही झाली. त्यादरम्यान काश्मीरप्रश्न हा देशासमोर असलेल्या आव्हानाच्या रूपात मांडण्यात आला.  काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानच्या दहशतवादाच्या भूमिकेवर सडकून टीका केली होती. पाकिस्तान हा असा शेजारी देश आहे, की ज्याने दहशतवाद पसरविण्याबरोबरच त्याला नाकारण्याचेही कसब मिळविले आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी नंदनवन असून 26/11 च्या हल्ल्यातील मास्टरमाईंड उघड माथ्याने हिंडत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. 9/11 चा न्यूयॉर्कवरील हल्ला  आणि 26/11 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांनी शांततेच्या प्रयत्नांना खीळ घातली आहे. भारत दहशवादामुळे त्रस्त असून, शेजारील देशच याला खतपाणी घालत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. प्रत्येक वेळी पाकिस्तानच्या कृत्यांमुळे शांतता चर्चा खंडित झाली आहे, असे स्वराज म्हणाल्या होत्या. पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतासमोर चर्चेसाठी प्रस्ताव ठेवला होता. भारतही तयार होता. मात्र, पाकिस्तानने भारताच्या तीन जवानांचे अपहरण करून एकाची हत्या केली. यामुळे भारताने पाकिस्तानला चर्चेसाठी नकार दिल्याचे, सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले होते. 

टॅग्स :hafiz saedहाफीज सईदnewsबातम्याPakistanपाकिस्तानIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर