पाकिस्तानचे महान क्रिकेटपटू हनीफ मोहम्मद यांचं निधन

By Admin | Updated: August 11, 2016 18:38 IST2016-08-11T18:38:47+5:302016-08-11T18:38:47+5:30

पाकिस्तानचे महान क्रिकेटपटू हनीफ मोहम्मद यांचं निधन झाल्याचं वृत्त पाकिस्तानमधल्या डॉन या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

Pakistan's great cricketer Hanif Mohammad passes away | पाकिस्तानचे महान क्रिकेटपटू हनीफ मोहम्मद यांचं निधन

पाकिस्तानचे महान क्रिकेटपटू हनीफ मोहम्मद यांचं निधन

ऑनलाइन लोकमत

कराची, दि. ११ - पाकिस्तानचे महान क्रिकेटपटू हनीफ मोहम्मद यांचं निधन झाल्याचं वृत्त पाकिस्तानमधल्या डॉन या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. हनीफ मोहम्मद यांचं निधन झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिल्याच्या हवाल्यानं डॉननं हे वृत्त दिलं आहे.

हनीफ मोहम्मद यांनी वयाच्या ८१व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. हनीफ मोहम्मद कर्करोगाने त्रस्त असल्यानं त्यांच्यावर कराचीमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. या आठवड्याच्या सुरुवातीला पाकिस्तानी माध्यमांनी हनीफ मोहम्मद अत्यवस्थ असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवल्याचे वृत्त दिले होते. मात्र आज त्यांचा मृत्यू झाल्याची दुःखद बातमी समजली आहे.  

हनीफ मोहम्मद यांनी १९५२-५३ ते १९६९-७० या कालावधीत एकूण ५५ कसोटी सामन्यात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करताना 12 शतके झळकवली होती. हनीफ मोहम्मद यांनी १९६७ साली ब्रिजटाऊनमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध करियरमधील सर्वोत्तम ३३७ धावांची खेळी केली. त्यांच्या या खेळीमुळे सामना अर्निणित राहिला. क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळीमध्ये हनीफ यांच्या या खेळींचा समावेश केला जातो.

Web Title: Pakistan's great cricketer Hanif Mohammad passes away