शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
2
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
3
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
4
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
5
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
6
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
7
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
8
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
9
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
10
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
11
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
12
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
13
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
14
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
15
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
16
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
17
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
18
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
19
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
20
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
Daily Top 2Weekly Top 5

आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 20:28 IST

५ जूनला पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताच्या कारवाईमुळे शिमला करार संपुष्टात आल्याचा दावा केला होता. 

इस्लामाबाद - पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी १९७२ च्या ऐतिहासिक शिमला कराराला डेड डॉक्युमेंट असा उल्लेख केला. ख्वाजा यांच्या या दाव्याने भारताला आयती संधीच मिळाली. पाकिस्ताननं आधी चूक केली आणि दुसऱ्याच दिवशी पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाला स्वत:च्या मंत्र्‍यांच्या विधानाला खुलासा करण्याची वेळ आली. भारतासोबत कुठलाही द्विपक्षीय करार रद्द करण्याचा अधिकृत निर्णय घेण्यात आला नाही असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. त्यामुळे पाकिस्तान सरकारमधील अंतर्गत कुरघोडी समोर आली.

एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितले की, अलीकडच्या घटना पाहता इस्लामाबादमध्ये अंतर्गत चर्चा निश्चितच होत आहेत परंतु आतापर्यंत भारतासोबत कुठलाही द्विपक्षीय करार रद्द करण्याबाबत औपचारिक कार्यवाही नाही. शिमला करार अद्यापही कायम आहे असं स्पष्ट केले. एक दिवस आधीच ५ जूनला पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताच्या कारवाईमुळे शिमला करार संपुष्टात आल्याचा दावा केला होता. 

शिमला करारात तिसरा कुणी नाही - ख्वाजा

जियो न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा आसिफ म्हणाले होते की, शिमला करार हा द्विपक्षीय होता कारण त्यात तिसरा कुणीही अथवा विश्व बँक नव्हती. इस्लामाबाद शिमला करार रद्द करण्याचा विचार करू शकते अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात नियंत्रण रेषा युद्ध विराम रेषा बनेल. शिमला करार संपुष्टात आणण्याच्या घोषणेचा पाकिस्तानवरच सर्वात वाईट परिणाम होऊ शकतो. कारण, १९७१ च्या भारत आणि पाकिस्तानमधील युद्धादरम्यान पाकिस्तानने काश्मीरमधील चुंब शहर ताब्यात घेतले होते, जे स्वातंत्र्यापासून भारताचा भाग होते. १९७२ च्या शिमला करारानुसार या शहरावर पाकिस्तानचे नियंत्रण कायम ठेवण्यात आले.

शिमला कराराचा इतिहास काय?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील १९७२ च्या युद्धानंतर शिमला करार बनवण्यात आला होता. या कराराचा हेतू दोन्ही देशातील तणाव आणि संघर्ष शांततेने आपापसात सोडवले जातील. त्यात इतर कुणीही मध्यस्थी करणार नाही. हा करार भारताच्या कुटनितीचा भाग होता.  १९६५ च्या युद्धादरम्यान पाकिस्तानने पीओकेतील चुंबवर कब्जा केला. युद्धानंतर चुंब पुन्हा भारताच्या ताब्यात आले परंतु १९७१ मध्ये पाकिस्तानने पुन्हा चुंबवर कब्जा केला. पुढे १९७२ च्या शिमला करारानुसार हे शहर पाकिस्तानचा भाग झाले. पुढे पाकिस्तानने चुंबचे नाव बदलून इफ्तिकाराबाद केले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतPOK - pak occupied kashmirपीओके