शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानने दिली दहशतवाद संपवण्याची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 13:37 IST

अमेरिकेच्या या इशाऱ्यानंतर पाकिस्तानने आश्वासन दिलंय की, ते दहशतवाद संपवण्यासाठी आणि भारतासोबत वाढलेला तणाव कमी करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करत आहे. याबाबतची माहिती अमेरिकेतील व्हाइट हाऊसमधील अधिका-यांनी दिली.

नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष वाढलेला असून दहशतवाद्यांविरोधातपाकिस्तानने ठोस कारवाई करावी अशी मागणी भारताने केली. पुलवामा हल्ल्याचा जगभरातून निषेध करण्यात आला. अमेरिकेनेही पाकिस्ताला तंबी देत दहशतवाद संपवा अन्यथा याचे वाईट परिणाम होतील असा इशारा दिला होता. अमेरिकेच्या या इशाऱ्यानंतर पाकिस्तानने आश्वासन दिलंय की, ते दहशतवाद संपवण्यासाठी आणि भारतासोबत वाढलेला तणाव कमी करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करत आहे. याबाबतची माहिती अमेरिकेतील व्हाइट हाऊसमधील अधिका-यांनी दिली. 

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री महमूद कुरेशी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यावेळी महमूद कुरेशी यांनी बोल्टन यांना दहशतवाद संपवण्याची ग्वाही दिली असल्याची माहिती जॉन बोल्टन यांनी ट्विटर वरुन दिली.  जॉन बोल्टन यांनी ट्विटरमधून सांगितले की,  जैश ए मोहम्मद आणि इतर दहशतवादी संघटना यांच्या विरोधात पाकिस्तानने ठोस कारवाई करावी यासाठी परराष्ट्र मंत्री महमूद कुरेशी यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी कुरेशी यांनी पाकिस्तान दहशतवाद संपविण्यासाठी कठोर कारवाई करत आहे त्याचसोबत गेल्या काही दिवसांपासून भारताशी वाढलेला तणाव कमी करण्याच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलत आहे. 

 

सध्या भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले हे अमेरिकेच्या तीन दिवस दौ-यावर आहे. त्यामुळे जॉन बोल्टन यांनी दिलेली माहिती महत्त्वपूर्ण आहे.  विजय गोखले यांनी दौ-याच्या पहिल्याच दिवशी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे की, दहशतवाद संपविण्यासाठी अमेरिकेचा पाकिस्तानवर दबाव कायम राहणार आहे. 

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रॉबर्ट पॅलाडिनो यांनी सांगितले की, परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो आणि भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्या झालेल्या बैठकीत दहशतवाद या विषयावर गंभीर चर्चा करण्यात आली. दहशतवाद्यांविरोधात पाकिस्ताने कठोर पावले न उचलावी याबाबत अमेरिकेने पाकिस्तानवर दबाव आणावा अशी मागणी भारताने केली. यावेळी पोम्पियो यांनी अमेरिका दहशतवाद्याच्या मुद्द्यावर नेहमी भारताच्या पाठीशी राहू असं विश्वास दिला. 

14 फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या तणाव वाढला होता. पुलवामा हल्ल्यात भारताचे 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक करून बालकोट येथे दहशतवादी तळांना टार्गेट केले होते.  

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारतPakistanपाकिस्तानpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादIndian Armyभारतीय जवान