पाकिस्तानी गायिकेची पतीने केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 04:09 IST2018-08-10T04:09:17+5:302018-08-10T04:09:21+5:30

पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतामध्ये महिला कलाकार, गायकांवर हल्ले होण्याचा तसेच त्यांची हत्या करण्याचा सिलसिला अद्यापही सुरू आहे.

Pakistani singer's husband Kali murder | पाकिस्तानी गायिकेची पतीने केली हत्या

पाकिस्तानी गायिकेची पतीने केली हत्या

कलान : पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतामध्ये महिला कलाकार, गायकांवर हल्ले होण्याचा तसेच त्यांची हत्या करण्याचा सिलसिला अद्यापही सुरू आहे. गायिका रेश्मा हिची पतीनेच गोळ्या घालून हत्या केली.
रेश्मा ही हल्लेखोराची चौथी पत्नी असून ती हकिमाबाद येथे भावाकडे राहात होती. रेश्मा व तिच्या पतीमध्ये काही कारणांवरून भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरला होता. हत्या केल्यानंतर रेश्माचा पती फरार झाला.
यंदा खैबर पख्तुनख्वा प्रांतात १५ महिला कलावंतांवर हल्ले करण्यात झाले आहेत. याआधी नाट्यअभिनेत्री सुनबुल हिची ३ फेब्रुवारी रोजी हत्या करण्यात आली होती. रेश्माने गायलेली पश्तो गाणी विलक्षण लोकप्रिय झाली होती. झोबल गोलुना या पाकिस्तानी नाटकात तिने केलेली भूमिका रसिकांनी डोक्यावर घेतली होती.

Web Title: Pakistani singer's husband Kali murder