इस्लामाबाद : पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांनी भारतावर अणुबॉम्ब हल्ला करण्याची धमकी दिली. आम्ही शाहीन, गोरी आणि गझनवीसारखी १३० क्षेपणास्त्रे भारतासाठी ठेवली आहेत. जर भारताने सिंधू पाणी करार थांबवला तर आम्ही त्यांचा श्वास थांबवू. भारताने युद्धासाठी तयार राहिले पाहिजे. पाकिस्तानची अण्वस्त्रे केवळ सजावटीसाठी ठेवली नाही. आम्ही देशभरात अनेक ठिकाणी अण्वस्त्रे लपवून ठेवली असल्याचे अब्बासी यांनी म्हटले आहे.
कंपन्या दिवाळखोरीत निघतील
अब्बासी म्हणाले, आमची क्षेपणास्त्रे भारताकडे टार्गेट करून ठेवली आहेत. भारताला आपल्याकडे शस्त्रे आहेत हे माहिती असल्याने ते आपल्यावर हल्ला करू शकत नाहीत. पाकने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले. जर १० दिवस हवाई क्षेत्र बंद ठेवले तर भारतीय विमान कंपन्या दिवाळखोरीत निघतील.
रशिया, चीनने मध्यस्थी करावी : पाकिस्तान
या हल्ल्याच्या चौकशीत पाकिस्तान रशिया आणि चीनला सहभागी करून घेऊ इच्छित आहे. पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, ‘मला वाटते की रशिया, चीन किंवा अगदी पाश्चात्य देशही यात खूप सकारात्मक भूमिका बजावू शकतात आणि ते एक तपास पथकदेखील स्थापन करू शकतात.