शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
9
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
10
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
11
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
12
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
13
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
14
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
15
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
16
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
17
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
18
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
19
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
20
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
Daily Top 2Weekly Top 5

२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 18:54 IST

FBI ला जेव्हा त्यांच्या गुप्तहेरांकडून माहिती मिळाली तेव्हा तपास यंत्रणेने शाहजेबच्या हालचालींवर नजर ठेवण्यास सुरुवात केली.

पाकिस्तानचादहशतवादी चेहरा पुन्हा एकदा जगासमोर उघडा पडला आहे. एका २० वर्षीय पाकिस्तानी नागरिक शाहजेब खान याला कॅनडातून प्रत्यार्पण करून अमेरिकेत पाठवण्यात आले आहे. शाहजेब खान न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन येथील यहूदी सेंटरवर दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत होता अशी माहिती अमेरिकन तपास यंत्रणा FBI च्या हाती लागली. जर हा हल्ला यशस्वी झाला असता तर तो 9/11 नंतरचा अमेरिकतला सर्वात मोठा हल्ला असता असं FBI चीफ काश पटेल यांनी सांगितले.

शाहजेब पाकिस्तानात जन्मला आहे. तो स्टुडेंट व्हिसा घेऊन कॅनडाला गेला. तिथे मिसिसॉगा येथे राहत त्याने ISIS सोबत मिळून अमेरिकेतील यहूदी समुदायाला टार्गेट करण्याची योजना आखली होती. हल्ल्यासाठी त्याने ७ ऑक्टोबर २०२४ ची तारीख निवडली. जी इस्त्रायलने हमासवर केलेल्या हल्ल्याची वर्षपूर्ती होती. ज्यात १२०० लोक मारले गेले होते आणि २०० हून अधिक लोकांचे अपहरण करण्यात आले होते. शाहजेबने उघडपणे म्हटलं होते की, या हल्ल्यात इतके लोक मारले असते जो 9/11 नंतरचा सर्वात मोठा हल्ला मानला असता. शाहजेब नोव्हेंबर २०२३ पासून सोशल मिडिया आणि एन्क्रिप्टेड APP च्या माध्यमातून कट्टरपंथी विचारांचा प्रसार करत आहे. तो एक ऑफलाइन दहशतवादी सेल बनवू इच्छित होता. त्याने ही योजना यशस्वी करण्यासाठी AR स्टाइल रायफल, सेमी ऑटोमॅटिक शस्त्रेही खरेदी केली होती. 

FBI ला जेव्हा त्यांच्या गुप्तहेरांकडून माहिती मिळाली तेव्हा तपास यंत्रणेने शाहजेबच्या हालचालींवर नजर ठेवण्यास सुरुवात केली. अमेरिकन अंडरकवर एजेंटने शाहजेबशी संपर्क साधला. त्याला विना ओळख दाखवता त्याच्याकडून शस्त्रे खरेदी आणि अमेरिकेची सीमा पार करून देण्यासाठी मदत मागितली. जेव्हा FBI ला शाहजेबचा हेतू स्पष्ट झाला, पुरावे सापडले तेव्हा सप्टेंबर २०२४ साली कॅनडाच्या क्यूबेक प्रांतातून त्याला अटक करण्यात आली. हा परिसर अमेरिकेच्या सीमेपासून केवळ २० किमी दूर आहे. अटकेनंतर शाहजेबला कोर्टात हजर केले आणि त्याला अमेरिकेला प्रत्यार्पण करण्यात आले. आता त्याच्यावर पुढील खटला न्यूयॉर्क कोर्टात चालवला जाणार आहे.

दरम्यान,कॅनडात ज्या खोलीत शाहजेब राहत होता, तिथे त्यांचा शांत स्वभाव आणि सामान्य जीवन पाहून कुणालाही तो दहशतवादी कट रचतोय याची भनक लागली नाही. त्याच्या अटकेनंतर आसपासचे लोकही हैराण झाले. शाहजेब याने अमेरिकेत हल्ला करण्यासाठी न्यूयॉर्क हे शहर यासाठी निवडले कारण तिथे सर्वाधिक यहूदी लोक राहतात. त्यामुळे जास्तीत जास्त यहुदींना टार्गेट करण्याचा त्याचा प्लॅन होता. तपासात त्याने अमेरिकेतील 9/11 हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला असता इतके लोक मारले गेले असते असं सांगितल्याची माहिती FBI ने दिली. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानAmericaअमेरिकाTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद