कुवेतमध्ये पाकिस्तानी नागरिकांना प्रवेशबंदी

By Admin | Updated: February 2, 2017 16:48 IST2017-02-02T16:48:43+5:302017-02-02T16:48:43+5:30

अमेरिकेपाठोपाठ कुवेतने पाच मुस्लिम देशातील नागरिकांना प्रवेशबंदी केली आहे. यामध्ये पाकिस्तानचाही समावेश आहे.

Pakistani ceasefire in Kuwait | कुवेतमध्ये पाकिस्तानी नागरिकांना प्रवेशबंदी

कुवेतमध्ये पाकिस्तानी नागरिकांना प्रवेशबंदी

ऑनलाइन लोकमत 

कुवेत शहर, दि. 2- अमेरिकेपाठोपाठ कुवेतने पाच मुस्लिम देशातील नागरिकांना प्रवेशबंदी केली आहे. यामध्ये पाकिस्तानचाही समावेश आहे. कुवेतने सीरिया, इराक, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराणमधील नागरिकांना  व्हिसा देणे स्थगित केले आहे. कुवेतमध्ये कट्टरपंथीय इस्लामी दहशतवाद्यांनी हात-पाय पसरु नये यासाठी खबरदारी म्हणून कुवेतने ही प्रवेशबंदी केली आहे. 
 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या आठवडयात सिरिया, इराण, इराक, सुदान, लिबीया, येमेन आणि सोमालिया या देशातील नागरीकांना प्रवेशबंदी करणा-या अध्यादेशावर स्वाक्षरी केली. या देशातील निर्वासितांना पुढचे 120 दिवस अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही. ट्रम्प यांच्याआधीच कुवेतने सीरियामधील नागरीकांना प्रवेशबंदी केली होती. 
 
2011 मध्येच सीरियन नागरीकांना व्हिसा देणे कुवेतने बंद केले होते. 2015 मध्ये दहशतवाद्यांनी शिया मशिदीवर केलेल्या हल्ल्यामध्ये 27 कुवेती नागरीकांचा मृत्यू झाला होता. 
 
 

Web Title: Pakistani ceasefire in Kuwait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.