शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान नरेंद्र मोदींना देणार सार्क संमेलनाचे निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 20:10 IST

पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सार्क संमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवण्याचा विचार पाकिस्तानकडून करण्यात येत असल्याचे वृत्त आहे.

ठळक मुद्देत पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सार्क संमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवण्याचा विचार पाकिस्तानकडून करण्यात येत असल्याचे वृत्त आहे.पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैसल यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानकडून औपचारिक निमंत्रण आल्यास त्यांची भूमिका काय असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे

इस्लामाबाद - सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांमुळे गेल्या काहीवर्षांपासून भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय संबंध बिघडले आहेत. दोन्ही देशांमधील चर्चाही थांबलेल्या आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सार्क संमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवण्याचा विचार पाकिस्तानकडून करण्यात येत असल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैसल यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. 2016 मध्ये पाकिस्तानमध्ये सार्क संमेलन आयोजित करण्यात आले होते. मात्र दहशतवाद्यांनी उरी येथे केलेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतासहीत सर्व देशांनी या संमेलनावर बहिष्कार घातला होता. त्यामुळे यावेळच्या संमेलनात कोणतीही कमतरता राहू नये यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानकडून औपचारिक निमंत्रण आल्यास त्यांची भूमिका काय असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तानIndiaभारत