पाकिस्तान ५०० दहशतवाद्यांना फासावर लटकवणार
By Admin | Updated: December 22, 2014 17:05 IST2014-12-22T16:41:15+5:302014-12-22T17:05:30+5:30
पाकिस्तानी सरकारने फाशीवरील बंदी उठवल्यानंतर असून येत्या काही आठवड्यात पाकिस्तान ५०० दहशतवाद्यांना फासावर लटकवणार आहे.

पाकिस्तान ५०० दहशतवाद्यांना फासावर लटकवणार
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. २२ - पेशावरमधील शाळेत तालिबानी दहशतवाद्यांनी घातलेल्या थैमानानंतर पाकिस्तानी सरकारने फाशीवरील बंदी उठविली असून येत्या काही आठवड्यात पाकिस्तान ५०० दहशतवाद्यांना फासावर लटकवणार आहे, अशी माहिती गृह मंत्रालयातर्फे देण्यात येत आहे.
गेल्या आठवड्यात पेशावरमधील शाळेवर झालेल्या निर्घृण हत्याकांडात १३२ मुलांसह १४९ निष्पापांचा बळी गेल्यानंतर पाकिस्तान सरकारने फाशीच्या शिक्षेवरील सहा वर्षाची बंदी उठविली आहे. त्यानंतर सहा जिहादींना फाशी देण्यात आली. त्यानंतर पाकिस्तानमधील विविध जेलमध्ये शिक्षा भोगणा-या सुमारे ५०० दहशतवाद्यांना येत्या दोन आठवड्यांत फासावर लटकवण्यात येणार आहे.