शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 12:13 IST

पाकिस्तान आपल्यासोबत आहे आणि अणु हल्ल्याच्या बाबतीत आपल्याला मदत करेल, असा दावा इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी)चे वरिष्ठ जनरल मोहसेन रेजाई यांनी एका मुलाखतीत केला होता.

इस्रायल नेत इराणच्या अण्वस्त्र तळांवर हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध कमालीचे ताणले आहेत. इस्रायलच्या हल्ल्यानंतर, इराणणेही ड्रोन आणि मिसाइलच्या माध्यमाने प्रत्युत्तर दिले होते. यातच इराणकडून एक मोठा दावा करण्यात आला होता. यात, जर इस्रायलने आमच्यावर अणुहल्ला केला, तर पाकिस्तान आपल्याला सहकार्य करेल आणि इस्रायलवर अणु हल्ला करेल. मात्र एक वृत्तानुसार, पाकिस्तानने, हा दावा फेटाळला आहे.

पाकिस्तान आपल्यासोबत आहे आणि अणु हल्ल्याच्या बाबतीत आपल्याला मदत करेल, असा दावा इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी)चे वरिष्ठ जनरल मोहसेन रेजाई यांनी एका मुलाखतीत केला होता. यानंतर,पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी इराणचा हा दावा चुकीचा असल्याचे म्हटले आहे. ''इस्लामाबादने अशा प्रकारचे कसलेही विधान केलेले नाही,'' असे आसिफ यांनी म्हणाले आहे.  

बंकरमध्ये लपून बसले आहेत खामेनेई - इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव शिगेला फोहोचला असतानाच एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. यानुसार, इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्लाह अली खामेनेई अपल्या संपूर्ण कुटुंबासह बंकरमध्ये लपून बसले असल्याचे वृत्त इराणी माध्यमांनी दिले आहे. काही वृत्तांमधून दावा करण्यात आला होता की, इस्रायलने खामेनेई यांच्यावर अटॅकची संपूर्ण योजना आखली होती. ही योजना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोरही मांडण्यात आली होती. मात्र ट्रम्प यांनी याला नकार दिला.

कुणाचे किती नुकसान? -इस्रायलच्या मॅगेन डेव्हिड अ‍ॅडोम बचाव सेवेनुसार, इराणने केलेल्या हल्ल्यानंतर देशात एकूण मृतांची संख्या १४ झाली आहे. याशिवाय, देशाचे मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि हवाई क्षेत्र तिसऱ्या दिवशीही बंद राहिले. दुसरीकडे इस्रायलने इराणच्या अणु आणि ऊर्जा स्थळांना तसेच नागरी इमारतींना लक्ष्य केले. इराणच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने शुक्रवारी केलेल्या हल्ल्यात इराणच्या  २२४ लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, माध्यमांतील वृत्तांनुसार, १,२७७ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेय९० टक्क्यांहून अधिक जखमी हे सामान्य नागरिक आहेत. महत्वाचे म्हणजे, या हवाई हल्ल्यात, सुमारे ३० इराणी लष्करी अधिकारी आणि शास्त्रज्ञांचाही मृत्यू झाला आहे.

 

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणPakistanपाकिस्तानwarयुद्ध