शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 12:17 IST

Pakistan water Crisis: पाकिस्तान सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करत आहे.

Pakistan water Crisis: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानसोबत असलेला सिंदू पाणी करार अनिश्चित काळासाठी स्थगित केला, त्यामुळे पाकमध्ये आतापर्यंतची सर्वात भीषण पाणी टंचाई आली आहे. जलतज्ज्ञांच्या मते, भारतातून वाहणाऱ्या चिनाब नदीचा प्रवाह ९२% ने कमी झाला आहे, ज्यामुळे पाकिस्तानातील पंजाब आणि सिंध सारख्या मोठ्या कृषी क्षेत्रातील पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

चिनाब नदीतील पाणी 'डेड लेव्हल' च्या खाली मीडिया रिपोर्ट्सनुसार, २९ मे रोजी चिनाब नदीचा प्रवाह ९८,२०० क्युसेक होता, जो आता ७,२०० क्युसेक पर्यंत कमी झाला आहे. पाण्याची पातळी इतकी घसरली आहे की, ती 'डेड लेव्हल' च्या खाली गेली आहे. यामुळे ४०% पेक्षा जास्त खरीप पिके सुकली असून, उर्वरित पिकेदेखील धोक्यात आली आहेत.

६.५ कोटी लोक प्रभावितपंजाब आणि सिंधमधील सुमारे ६.५ कोटी लोक सिंचनासाठी चिनाबवर अवलंबून आहेत. पाण्याची कमतरता आणि पिकांच्या नुकसानीमुळे त्रस्त शेतकरी संघटनांनी आता इस्लामाबादमध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे की, सरकार कोणतीही मदत देत नाही आणि भारताविरुद्ध कोणतेही स्पष्ट राजनैतिक पाऊल उचलले गेले नाही.

४,५०० अब्ज रुपयांचे नुकसानकृषी संघटना 'पीआरए' आणि सिंचन विभागाच्या आकडेवारीनुसार, पावसाअभावी आणि पाणीपुरवठ्यात घट झाल्यामुळे पाकिस्तानला आतापर्यंत ४,५०० अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे. भूजल पातळीही घसरली आहे आणि हजारो ट्यूबवेल कोरड्या पडल्या आहेत. मंगला धरणासारख्या प्रमुख जलस्रोतांची पाणी पातळीही धोक्याच्या रेषेखाली गेली आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की, ही परिस्थिती अशीच राहिली तर पाकिस्तानला गंभीर राष्ट्रीय अन्न संकटाचा सामना करावा लागू शकतो.

पाण्यासाठी भारताकडे विनवणीसिंधू पाणी करार आणि पाणीपुरवठा पुनर्संचयित करण्याबाबत पाकिस्तानने आतापर्यंत भारताला चार औपचारिक पत्रे पाठवली आहेत. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, यापैकी एक पत्र ऑपरेशन सिंदूरनंतर पाठवण्यात आले होते. ही सर्व पत्रे पाकिस्तानच्या जलसंपदा मंत्रालयाचे सचिव सय्यद अली मुर्तझा यांनी भारताच्या जलशक्ती मंत्रालयाला पाठवली होती, जी नंतर परराष्ट्र मंत्रालयाकडे (एमईए) पाठवण्यात आली.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तान