पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन
By Admin | Updated: July 21, 2015 00:26 IST2015-07-21T00:26:02+5:302015-07-21T00:26:02+5:30
जम्मू-काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरील भारतीय चौक्यांना लक्ष्य बनवत पाकिस्तानने सोमवारी गोळीबार केल्याने या भागात दहशत पसरली आहे

पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन
जम्मू : जम्मू-काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरील भारतीय चौक्यांना लक्ष्य बनवत पाकिस्तानने सोमवारी गोळीबार केल्याने या भागात दहशत पसरली आहे. पाकिस्तानी सैन्याने नव्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करताना पूँछ जिल्ह्यात अनेक ठिकाणी गोळीबार केल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. रविवारी रात्री १०.४५ वाजता पाकिस्तानकडून गोळीबार झाल्यानंतर भारतीय जवानांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. (वृत्तसंस्था)