शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 13:03 IST

Pakistan News: पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत दहशतवादाशी संबंधित समित्यांचे अध्यक्षपद मागितले होते.

Pakistan UNSC Demands: पहलगाम हल्ला आणि भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतरपाकिस्तान सतत आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर तोंडावर पडत आहे. आता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारला मोठा धक्का बसला आहे. चार महत्त्वाच्या दहशतवादाशी संबंधित समित्यांचे अध्यक्षपद मिळावे ही पाकची मागणी इतर सदस्य देशांनी फेटाळून लावली आहे. 

एकमत नसल्यामुळे UNSC मध्ये विलंबमिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानला फक्त तालिबान निर्बंध समितीचे अध्यक्षपद आणि दहशतवाद विरोधी समितीचे (CTC) उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या मागण्यांमुळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) एकमत होऊ शकले नाही. यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या समित्यांच्या विभाजनात सुमारे पाच महिने विलंब झाला. हे काम जानेवारी २०२५ पर्यंत पूर्ण व्हायला हवे होते.

UN चे सदस्य पाकिस्तानच्या मागण्यांबद्दल नाराजसंयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (UNSC) उर्वरित सदस्य पाकिस्तानच्या मागण्यांबद्दल नाराज होते. पाकिस्तानचा दृष्टिकोन हट्टी आणि अन्याय्य असल्याचे मत इतर देशांनी व्यक्त केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे पाच स्थायी सदस्य - चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका पाकिस्तानला कोणत्याही समितीचे अध्यक्षपद घेऊ इच्छित नव्हते. सरकारी सूत्रांनुसार, पाकिस्तानला मिळालेले CTC चे उपाध्यक्ष पद फक्त नावापुरते आहे. हे कोणत्याही महत्त्वाच्या जबाबदारीचे पद नाही.

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ