शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्ताननं गुडघे टेकले! आर्थिक चणचणीमुळे भारताकडे केली मोठी मागणी; बंदीचा निर्णय पडला महागात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 15:10 IST

Pakistan PM Imran Khan: भारताकडे कापसाच्या आयातीवरील (Cotton Import) निर्बंध हटविण्यासाठीची विनंती पाकिस्तानने केली आहे

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांच्या अध्यक्षतेखालील वस्त्रोद्योग मंत्रलयानं (Textitle Ministry) देशातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील कच्च्या मालाच्या कमतरतेला भरुन काढण्यासाठी भारताकडे कापसाच्या आयातीवरील (Cotton Import) निर्बंध हटविण्यासाठीची विनंती केली आहे. पाकिस्तानातील 'डॉन न्यूज'नं दिलेल्या सरकारी सुत्रांच्या माहितीनुसार वस्त्रोद्योग मंत्रालयानं भारताकडून कापूस आणि सुती धाग्यांच्या आयातीवरील निर्बंध हटविण्यात यावेत यासाठी कॅबिनेटच्या आर्थिक समन्व समितीची (ECC) परवानगी मागितली आहे. 

भारतानं घातलेले निर्बंध हटविण्याची मागणी करणारं पत्र गेल्या आठवड्यातच 'ईसीसी'ला पाठवलं असल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. समन्वय समितीच्या निर्णायाला औपचारिकरित्या अनुमोदन मिळण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवण्यात येईल. पंतप्रधान इमरान खान यांनी वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या प्रभारी या नात्यानं प्रस्ताव ईसीसी समोर मांडण्यास मंजुरी देखील दिली असल्याचं कळतं. आता भारत यावर कोणतही भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

पाकिस्तानात कापसाचं उत्पादन घटलंपाकिस्तानात कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळेच पाकला आता भारताकडून कापूस आयात करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. कापसाच्या कमतरतेमुळे पाकिस्तानवर अमेरिका, ब्राझील आणि उझबेकिस्तानकडून कापूस आयात करण्याची नामुष्की ओढावली. पाकिस्तानळा यंदाच्या वर्षात १२ मिलियन बेल्स कापसाची गरज आहे. पण एका अहवालानुसार पाकिस्तान यंदा केवळ ७.७ मिलियन बेल्स कापसाचं उत्पादन करु शकणार आहे. उर्वरित ५.५ मिलियन बेल्स कापूस पाकिस्तानला आयात करावा लागणार आहे. 

भारताकडून कापूस आयात करण्याचे पाकिस्तानला फायदेपाकिस्तानवर अमेरिका, ब्राझील आणि उझबेकिस्तानकडून कापूस आयात करण्याची वेळ आली असली तरी या सर्वांपेक्षा भारतात कापूस स्वस्त आहे. त्यामुळे भारताकडून कापूस खरेदी करण्याचा पाकिस्तानला खूप मोठा फायदा होणार आहे. त्यात भारताकडून आयात केल्याच कच्चा माल अवघ्या तीन ते चार दिवसांत पाकिस्तानात पोहोचेल. इतर देशांचा कापूस खरेदी करणं पाकिस्तानला महाग तर ठरेलच पण माल देशात येण्यासाठी किमान एक ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो. 

पाकिस्तानच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अहवालानुसार, पाकिस्तानच्या निर्यात क्षेत्रात तब्बल ६० टक्के योगदान हे वस्त्रोद्योग मंत्रालयाचं आहे. तर एकूण उत्पादन क्षेत्रात वस्त्रोद्योगाचा वाटा तब्बल ४६ टक्के इतका आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेतील वस्त्रोद्योगाचा वाटा १० टक्के इतका आहे. २०१९ साली भारत सरकारनं जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर पाकिस्ताननं भारतासोबतच्या व्यापार रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. भारतासोबतचे हवाई आणि इतर मार्गांवरील संपर्क देखील तोडण्याचा निर्णय पाकिस्ताननं घेतला होता. यासोबतच व्यापार आणि रेल्वे सेवा देखील रद्द केली होती.  

टॅग्स :Imran Khanइम्रान खानcottonकापूसInternationalआंतरराष्ट्रीयPakistanपाकिस्तान