शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इमरान खान यांची हॅटट्रिक ! लाहोरमध्ये तिस-यांदा केला निकाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 09:03 IST

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)चे अध्यक्ष इमरान खान यांनी तिस-यांदा निकाह केला आहे.

इस्लामाबाद  -  पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)चे अध्यक्ष इमरान खान यांनी तिस-यांदा निकाह केला आहे. बुशरा मनेका असे त्यांच्या तिस-या पत्नीचं नाव आहे. रविवारी (18 फेब्रुवारी ) लाहोर येथे अगदी साध्या समारंभात त्यांनी आपला निकाह केला. पाकिस्तान तहरीक-ए- इन्साफ ( पीटीआय )चे प्रवक्ते फवाद चौधरी यांनी इमरान खान यांच्या तिस-या निकाहच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बुशरा मनेका यांच्या निवासस्थानी त्यांचा निकाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात केवळ जवळच्या नातेवाईकांना निमंत्रित करण्यात आले होते. दरम्यान, इमरान खान यांच्या बहिणी निकाह सोहळ्या सहभागी झाल्या नव्हत्या. अवन चौधरी व जुल्फी बुखारी यांच्या उपस्थितीत त्यांचा निकाह झाला. चौधरी व बुखारी हे साक्षीदार म्हणून उपस्थित होते.  

दरम्यान, पार्टी नेता इनामुल हक यांनी सांगितले की, इमरान खान यांना अगदी साध्या पद्धतीनं निकाह करायचा होता. केवळ इमरान खान व त्यांच्या पत्नीसाठीच नाही तर संपूर्ण पाकिस्तानसाठी हा निकाहसोहळा आनंद घेऊन येईल, अशी आशाही यावेळी हक यांनी व्यक्त केली. नईमुल हक, शीरीन मजारी, जहांगीर तारीन, शाह महमूद कुरैशी यांच्यासहीत पार्टीच्या नेत्यांनी इमरान खान आणि त्यांची तिसरी पत्नी बुशरा मनेका यांना निकाहच्या ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. 

40 वर्षीय बुशरा मनेका यांचा यापूर्वी खवर फरीद मनेका यांच्यासोबत निकाह झाला होता. खवर फरीद मनेका हे इस्लामाबाद येथे वरिष्ठ कस्टम अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी बुशरा यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 

इमरान खान यांचा तिसरा निकाह इमरान खान यांचे यापूर्वी दोनदा निकाह झाले आहेत. पहिली पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांच्यासोबत त्यांनी 1995 साली निकाह केला होता. 2004 मध्ये त्यांनी जेमिमा यांना घटस्फोट दिला. यानंतर दुसरी पत्नी रेहम खानसोबत 2015 मध्ये त्यांनी निकाह केला. मात्र 10 महिन्यांनंतर रेहम व इमरान यांनी स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतला.  

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान