शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भारताची डोकेदुखी वाढणार; पाकिस्तान रशियाकडून रणगाडे, लढाऊ विमानांची खरेदी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2018 13:17 IST

हवाई सुरक्षा यंत्रणेच्या खरेदीसाठीही चर्चा सुरू

पाकिस्तानने रणगाडे आणि लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी रशियाशी बोलणी सुरु केली आहे. याशिवाय रशियाकडून हवाई सुरक्षा यंत्रणेची खरेदी करण्याचाही पाकिस्तानचाही प्रयत्न आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री खुर्रम दस्तगीर खान यांनी याबद्दलच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पाकिस्तान आणि चीनचे सौख्य जगजाहीर असताना आता पाकिस्तान आणि रशियाची जवळीक वाढताना दिसत आहे.'रशियाकडून हवाई सुरक्षा यंत्रणा खरेदी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. रशियाचे शस्त्रास्त्र तंत्रज्ञान अद्ययावत आहे. त्यामुळेच आम्ही त्यांच्याकडून हवाई सुरक्षा खरेदी करण्याच्या विचारात आहोत. त्यासाठी रशियाशी चर्चा सुरु आहे. याबद्दलच्या वाटाघाटी पूर्ण झाल्यावर अधिकृत घोषणा केली जाईल,' अशी माहिती खान यांनी स्पुटनिक या रशियन वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. याशिवाय पाकिस्तान रशियाकडून टी-90 रणगाड्यांची खरेदी करण्यासही उत्सुक असल्याचे खान म्हणाले. विशेष म्हणजे भारतही मोठ्या प्रमाणात टी-90 रणगाड्यांचा वापर करतो. थर्ड जनरेशन मिसाईल सिस्टीमसह टी-90 रणगाडे आणून लष्कराचे सामर्थ्य वाढवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. 'टी-90 रणगाड्यांच्या लष्कराच्या ताफ्यात समावेश करण्यास आम्ही उत्सुक आहोत. आम्ही एकदाच रणगाडे खरेदी करुन थांबणार नाही. रशियाकडून दीर्घकाळ रणगाड्यांची खरेदी करण्याचा आमचा प्रयत्न असेल,' असेही खान यांनी रशियन वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. हवाई सुरक्षा यंत्रणा, टी-20 रणगाडे यांच्यासोबतच लढाऊ विमानांची खरेदी करण्याचाही पाकिस्तानचा प्रयत्न आहे. रशियाकडून Su-35 लढाऊ विमाने खरेदी करण्याबद्दलची चर्चा पाकिस्तानकडून सुरु आहे. ही चर्चा सध्या प्राथमिक टप्प्यात आहे. पुढील काही वर्षात याबद्दलच्या कराराला मूर्त स्वरुप मिळेल, असे वृत्त रशियन संकेतस्थळांनी दिले आहे. याशिवाय अफगाणिस्तानमधील परिस्थितीबद्दलही पाकिस्तान आणि रशियामध्ये चर्चा झाली आहे. अफगाणिस्तान स्थिर राहावा, अशी दोन्ही देशांची इच्छा असल्याचेही पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी मुलाखतीत म्हटले.