इस्लामाबाद: कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आपल्याच भूमीवर असल्याची कबुली पाकिस्ताननं काल दिली होती. मात्र आता पाकिस्ताननं कोलांटउडी घेतली आहे. अवघ्या २४ तासांच्या आत पाकिस्ताननं यू-टर्न घेत दाऊद देशात वास्तव्यास नसल्याचा दावा केला आहे. पाकिस्ताननं स्वत:च दाऊदच्या वास्तव्याची कबुली दिल्यानं त्याबद्दलचं वृत्त भारतीय माध्यमांनी दिलं. त्यानंतर पाकिस्ताननं स्पष्टीकरण दिलं. दाऊद पाकिस्तानात नसल्याचा दावा त्यांनी केला.पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं एक निवेदन प्रसिद्ध केलं. 'पाकिस्तानकडून नवे निर्बंध घातले जात आहेत, अशा बातम्या काही ठिकाणी प्रसिद्ध झाले आहेत. मात्र यात अजिबात तथ्य नाही. काही कुख्यात व्यक्तींचं (दाऊद इब्राहिम) वास्तव्य देशात असल्याची कबुली पाकिस्ताननं दिल्याचं वृत्त भारतीय माध्यमांनी दिलं आहे. या वृत्ताला कोणताही आधार नाही,' असं स्पष्टीकरण पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिलं आहे.
दाऊदवरून पाकिस्तानचा यू-टर्न; आता म्हणे, तो आमच्या देशात वास्तव्यासच नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 08:06 IST
अवघ्या २४ तासांत पाकिस्ताननं दाऊद इब्राहिमच्या वास्तव्यावरून यू-टर्न घेतला
दाऊदवरून पाकिस्तानचा यू-टर्न; आता म्हणे, तो आमच्या देशात वास्तव्यासच नाही
ठळक मुद्देअवघ्या २४ तासांमध्ये पाकिस्तानची दाऊदवरुन कोलांटउडीआधी वास्तव्याची कबुली; आता वास्तव्य नसल्याचा दावापाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा उघड; एफएटीएफपासून बचाव करण्यासाठी खेळी