शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Pakistan Sindh Hindu Girl : संतापजनक! पाकिस्तानात 6 वर्षांच्या चिमुकलीवर दोघांचा अत्याचार, पोलिसांनीही केली नाही मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 11:52 IST

स्थानिकांनी जखमी अवस्थेत असलेल्या रितूला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मात्र, तक्रार दाखल करूनही पोलीस प्रशासन सुस्त आहे. एवढेच नाही, तर त्यांनी कुठल्याही प्रकारच्या मदतीचे आश्वासनही दिले नाही. 

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील टांडो अल्लायार जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून हिंदू अल्पसंख्यकांना निशाना बनवले जात आहे. बिटर विंटरच्या एका वृत्तानुसार, पाकिस्तानात मानवाधिकार संघटना आणि कार्यकर्त्यांनी रितू (बदललेले नाव) नावाच्या चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाकडे लक्ष आकर्षित केले आहे. 

टांडो अल्लायार जिल्ह्यात शेख भिरकिओ गावातील 6 वर्षांच्या अल्पसंख्याक हिंदू चिमुकलीवर 23 वर्षांच्या दोन तरुणांनी लैंगिक अत्याचार केला. संबंधित पीडित चिमुकली रितू घराबाहेर खेळत असताना हा प्रकार घडला. यानंतर ती तिच्या घरापासून जवळपास सहा किलोमीटर अंतरावर बुशुद्धावस्थेत आढळून आली.

पोलिसांनी मदतच केली नाही -यानंतर, स्थानिकांनी जखमी अवस्थेत असलेल्या रितूला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मात्र, तक्रार दाखल करूनही पोलीस प्रशासन सुस्त आहे. एवढेच नाही, तर त्यांनी कुठल्याही प्रकारच्या मदतीचे आश्वासनही दिले नाही. 

बिटर विंटरच्या वृत्तानुसार, सिंध प्रांतातील शेख भिरकियोमध्ये नेहमीच अल्पसंख्याकांना टारगेट केले जाते. हे गाव अनेक वेळा सांप्रदायिक हिंसाचाराचे केंद्रही राहिले आहे. 

हिंदूं अल्पसंख्याकांचा घरावर हल्ला -याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात काही गुंडांनी निलो कोल्ही नावाच्या एका व्यक्तीच्या घरावर लाठ्या-काठ्या आणि बंदुकीसह हल्ला केला होता. बिटर विंटरच्या वृत्तानुसार, या हल्ल्यात निलो कोल्ही यांची मुलगी सुधी गंभीर जखमी झाली होती. यानंतर घटनेची तक्रार पोलिसांत देण्यात आली. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यास दिरंगाई केली, असे निलो कोल्ही यांनी म्हटले आहे.

शेख भिरकियोमध्ये ऑक्टोबर 2022 मध्ये एका 10 वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. ती तिच्या घराबाहेर कपडे धूत होती. तिच्यावर धर्मांतरासाठी आणि लग्न करण्यासंदर्भात दबाव टाकण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी मुलीची सुटका करून तिला शेल्टर होममध्ये ठेवण्यात आले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानSexual abuseलैंगिक शोषणHinduहिंदूMuslimमुस्लीमPoliceपोलिस