पाकिस्तान बंद करणार -इम्रान खान
By Admin | Updated: December 2, 2014 00:02 IST2014-12-02T00:02:09+5:302014-12-02T00:02:09+5:30
पाकिस्तानातील नवाज शरीफ सरकारने २०१३ च्या निवडणुकीतील गैरप्रकारांचा शोध घेण्याचे आदेश दिले नाहीत तर १६ डिसेंबरनंतर संपूर्ण पाकिस्तान बंद पाडला

पाकिस्तान बंद करणार -इम्रान खान
इस्लामाबाद : पाकिस्तानातील नवाज शरीफ सरकारने २०१३ च्या निवडणुकीतील गैरप्रकारांचा शोध घेण्याचे आदेश दिले नाहीत तर १६ डिसेंबरनंतर संपूर्ण पाकिस्तान बंद पाडला जाईल, असा इशारा पाकिस्तानचा विरोधी पक्ष नेता इम्रान खान याने दिला आहे.
पाकिस्तान तेहरिक इ इन्साफ या पक्षाचा प्रमुख असणाऱ्या इम्रानने रविवारी इस्लामाबाद शहरात प्रचंड रॅली काढली होती. गेल्या वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाले असून, त्यांची निष्पक्ष चौकशी करण्याची इम्रानची मागणी आहे. (वृत्तसंस्था)