शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय उच्चायुक्तांना पाकिस्तानने परत पाठवले, भारतासोबतचे व्यापारी संबंधही तोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 06:18 IST

१५ ऑगस्टला पाक काळा दिवस पाळणार; ३७० कलम रद्दबातल केल्याने जळफळाट

इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्दबातल केल्याने जळफळाट झालेल्या पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना परत पाठवले आहे. शिवाय त्यांचे भारतातील उच्चायुक्त मोईन उल हक्क यांना माघारी बोलावून घेतले आहे.यासोबतच भारताबरोबरचे व्यापारी संबंधही तोडण्याचा तसेच राजनैतिक संबंध निम्नस्तरावर आणण्याचा निर्णय घेतला आहे.काश्मीरबाबतच्या भारताच्या निर्णयाविरोधात संयुक्त राष्ट्रात धाव घेण्याचे पाकिस्तानने ठरवले आहे. १५ ऑगस्ट हा काळा दिवस म्हणून पाळण्याचा निर्णयही पाकने जाहीर केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये हे निर्णय घेण्यात आले. कातावलेल्या पाकिस्तानने आपल्या पार्लमेंटचे तातडीचे संयुक्त अधिवेशन मंगळवारी बोलावले आणि ३७० कलमाचा निर्णय घेतल्याने पुलवामासारखे आणखी हल्ले होण्याची शक्यता असल्याची दर्पोक्ती पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली. भारताने ३७0 कलम रद्द केल्याने आणि लडाख हे वेगळे केंद्रशासित राज्य म्हणून जाहीर केल्यामुळे नाराजी व्यक्त करणाऱ्या चीनने कैलास मानसरोवरला जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांना व्हिसा नाकारला आहे. (वृत्तसंस्था)काश्मीरमधील स्थितीचा पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. भारताने काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्याचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत उपस्थित करण्याचे पाकिस्तानने ठरविले आहे. काश्मिरी जनतेला समर्थन देण्यासाठी यंदा १४ ऑगस्टला पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370