संतापजनक!: पाकिस्तानची नवी चाल; करतारपूर गुरुद्वाराच्या देखभालीपासून शीख बांधवांना हटवलं, तयार केली नवी संस्था

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 5, 2020 09:16 AM2020-11-05T09:16:54+5:302020-11-05T09:22:55+5:30

विशेष म्हणजे, करतारपूर गुरुद्वाराची जबाबदारी ज्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट यूनिटला सोपवण्यात आली आहे. त्यातील सर्वच्या सर्व ९ सदस्य Evacuee Trust Property Board (ETPB)शी संबंधित आहेत.

Pakistan Removed Sikhs from Kartarpur Gurdwara management, created new committee | संतापजनक!: पाकिस्तानची नवी चाल; करतारपूर गुरुद्वाराच्या देखभालीपासून शीख बांधवांना हटवलं, तयार केली नवी संस्था

संतापजनक!: पाकिस्तानची नवी चाल; करतारपूर गुरुद्वाराच्या देखभालीपासून शीख बांधवांना हटवलं, तयार केली नवी संस्था

googlenewsNext
ठळक मुद्देइम्रान सरकारने गुरुद्वाराच्या देखभालीचे काम पाकिस्तान शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीकडून काढून ते एका नव्या संस्थेकडे दिले आहे.आता करतारपूर गुरुद्वाराची जबाबदारी प्रोजेक्ट मॅनेजमेन्ट यूनिटकडे सोपवण्यात आली आहे.गुरुद्वाराच्या देखभालीसाठी तयार करण्यात आलेल्या या संस्थेत एकही शीख संदस्य नाही.


इस्लामाबाद - करतापूर गुरुद्वारासंदर्भात पाकिस्तानची नवी चाल समोर आली आहे. पाकिस्तानातील इम्रान सरकारने गुरुद्वाराच्या देखभालीचे काम पाकिस्तान शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीकडून काढून ते एका नव्या संस्थेकडे दिले आहे. विशेष म्हणजे गुरुद्वाराच्या देखभालीसाठी तयार करण्यात आलेल्या या संस्थेत एकही शीख संदस्य नाही. आता करतारपूर गुरुद्वाराची जबाबदारी प्रोजेक्ट मॅनेजमेन्ट यूनिटकडे सोपवण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, करतारपूर गुरुद्वाराची जबाबदारी ज्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट यूनिटला सोपवण्यात आली आहे. त्यातील सर्वच्या सर्व ९ सदस्य Evacuee Trust Property Board (ETPB)शी संबंधित आहेत. एवढेच नाही तर, असेही सांगण्यात येते, की पाकिस्तानी गुप्तचरसंस्था आयएसआय ETPBला कंट्रोल करते.

प्रोजेक्ट मॅनेजमेंट यूनिटचा सीईओ मो. तारिक खानला करण्यात आले आहे. पाकिस्तान सरकारने करतारपूर गुरुद्वारासंदर्भात जारी केलेल्या आदेशात गुरुद्वाराच्या माध्यमाने व्यापार करण्याची योजना आहे. या आदेशात प्रोजेक्ट बिझनेस योजनेचाही उल्लेख आहे. अर्थात या गुरुद्वारापासून पैसा कमावण्याचा इम्रान सरकारचा इरादा आहे.

काय आहे करतारपूर कॉरिडोर -
शीखांच्या पवित्र धार्मिक स्थळांपैकी एक असलेले करतारपूर साहीब हे गुरुनानक देवांचे निवास स्थान म्हणून ओळखले जाते. पाकिस्तानात असलेल्या या ठिकाणीच गुरुनानक देवांनी अखेरचा श्वास घेतला होता. पूर्वी शीख बांधव दूर्बीणीच्या सहाय्यानेच करतारपूर गुरुद्वाराचे दर्शन करायचे. मात्र, भारत-पाकिस्तान सरकारने एकत्रितपणे कॉरिडोर तयार केला आहे.

भारतातील पंजाबमधील डेरा बाबा नानकपासून आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत कॉरिडोरची निर्मिती करण्यात आली आहे. तर पाकिस्ताननेही सीमेपासून नारोवाल जिल्ह्यातील गुरुद्वारापर्यंत कॉरिडोर तयार केला आहे. यालाच करतारपूर साहीब कॉरिडोर म्हणून संबोधले जाते. करतारपूर कॉरिडोरसंदर्भात पाकिस्तानची चाल अनेक वेळा समोर आली आहे.

Web Title: Pakistan Removed Sikhs from Kartarpur Gurdwara management, created new committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.