शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Mission Shakti: 'मिशन शक्ती'नं पाकमध्ये भूकंप, इम्रान खान यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 19:46 IST

भारतानं क्षेपणास्त्राच्या मदतीने उपग्रह नष्ट करण्याची शक्ती मिळवली आहे.

इस्लामाबाद- भारतानं क्षेपणास्त्राच्या मदतीने उपग्रह नष्ट करण्याची शक्ती मिळवली आहे. त्यानंतर पाकिस्तानमध्येही खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं जगातल्या इतर देशांकडे भारताविरोधात आवाज उठवण्याचा आग्रह केला. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं एक पत्रक प्रसिद्धीस दिलं आहे. त्या पत्रकात म्हटलं आहे की, पाकिस्तान हा अंतरिक्षाला मानवतेचा वारसा या दृष्टीनं पाहतो. प्रत्येक देशानं अशा हालचालींपासून दूर राहिलं पाहिजे. जेणेकरून अंतरिक्षाचं सैन्यीकरण होणार नाही. गेल्या अनेक काळापासून ज्या देशांनी याविरोधात आवाज उठवला आहे, ते पुन्हा एकदा यासंदर्भात आवाज उठवतील, अशी आशा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून व्यक्त केली आहे.परंतु पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकात भारताच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. भारतानं मिशन शक्ती फत्ते केल्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून ही प्रतिक्रिया आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही सुरक्षेच्या मुद्द्यावर उच्चस्तरीय बैठक बोलावली. बैठकीत पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल बावजा यांच्यासह अनेक सैन्य अधिकारी उपस्थित होते. भारतानं अवकाश संशोधन क्षेत्रात मोठं यश मिळवलं आहे.भारतानं मिसाइलच्या सहाय्यानं उपग्रह पाडला आहे. अशा प्रकारे मिसाइलच्या सहाय्यानं उपग्रह पाडणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरला आहे. भारतानं अवकाश संशोधन क्षेत्राच्या इतिहासात स्वतःचं नाव कोरलं आहे. उपग्रहरोधक शस्त्र म्हणजेच A-SAT ने लाईव्ह सॅटेलाइटचा वेध घेतल्यानं भारताला अवकाश संशोधन क्षेत्रात मोठं यश मिळालं आहे.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानMission Shaktiमिशन शक्ती