शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
2
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
3
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
4
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
5
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
6
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
7
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
8
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
9
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
10
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
11
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
12
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
13
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव
15
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
16
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
17
‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’
18
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
19
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
20
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ

पाकिस्तानमध्ये बलात्काऱ्याला मुलीच्या वडिलांसमोरच दिली फाशी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 1:47 PM

पाकिस्तानमध्ये 7 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात आली आहे.

इस्लामाबाद- पाकिस्तानमध्ये 7 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात आज सकाळी या आरोपीला सुळावर चढवण्यात आलं. दोषी आरोपीचं नाव इम्रान अली असून, त्यानं अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. न्यायाधीश आदिल सरवर यांनी बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांसमोरच आरोपी इम्रान अलीला फाशी दिली आहे. तसेच त्याचा मृतदेह अर्धा तास लटकलेल्या अवस्थेत होता.मंगळवारी आरोपीला स्वतःच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी 45 मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी त्याला फाशी दिली. इम्रान अलीला जानेवारीमध्ये पोलिसांनी अटक केली होती. पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयात(एटीसी) वेगवेगळ्या प्रकरणात 21 खून प्रकरणातही त्याच्यावर आरोप होते. तसेच इम्राननं आतापर्यंत 9 मुलींवर बलात्कार केला असून, त्यात या 7 वर्षांच्या मुलीचाही समावेश होता. अल्पवयीन मुलीचं अपहरण करून त्यानं तिच्यावर बलात्कार केला होता.9 जानेवारी 2018ला अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला होता. त्यानंतर पूर्ण पाकिस्तानमध्ये विरोध प्रदर्शन करण्यात आलं होतं. प्रकरण पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयातही गेलं. तेव्हा न्यायालयानं तीन दिवसांत आरोपीला अटक करण्याचे पोलिसांना आदेश दिले होते. कालांतरानं आरोपीला अटक करण्यात आली. माझ्यासमोरच त्याला सुळावर चढवल्यानं मी समाधानी आहे, असं पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितलं आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तान