शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

युद्ध झालं तर मंदिरांमधला घंटानाद बंद होईल; पाकिस्तानच्या मंत्र्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 19:55 IST

इम्रान खान यांच्या भाषणानंतर पाकिस्तानच्या मंत्र्याची भारताला धमकी

इस्लामाबाद: पुलवामा हल्ल्याच्या 5 दिवसांनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जनतेशी संवाद साधला. या हल्ल्यात पाकिस्तानचा हात नाही. कोणत्याही ठोस पुराव्यांशिवाय भारताकडून पाकिस्तानवर आरोप केले जात असल्याचा दावा त्यांनी भाषणात केला. हल्ल्याचे पुरावे द्या, चौकशीला सहकार्य करतो, असंदेखील इम्रान म्हणाले. भारतानं आक्रमण केल्यास पाकिस्तानदेखील चोख प्रत्युत्तर देईल, अशा इशारादेखील खान यांनी दिला. यानंतर आता खान यांचे मंत्रीदेखील भारताविरोधात आगलावी भाषणं करु लागले आहेत. भारतानं शांततेची बोलणी केली, तर आम्हीदेखील शांततेविषयी बोलू. मात्र त्यांनी युद्धाची भाषा केली, तर आम्हीदेखील त्याच भाषेत उत्तर देऊ, असं पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद म्हणाले. इम्रान खान यांनी 20 कोटी पाकिस्तानी जनतेच्या वतीनं भाषण केलं. पाकिस्ताननं हातात बांगड्या घातलेल्या नाहीत, हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. आमच्यासाठी पाकिस्तान म्हणजे जीवन आहे आणि पाकिस्तान म्हणजेच मरण आहे. पाकिस्तानकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं, तर त्याचे डोळे काढून घेऊ, अशी धमकी त्यांनी दिली. युद्धाची भाषा केल्यास आम्ही त्याच पद्धतीनं उत्तर देऊ. मग ना कधी गवत उगवेल, ना चिमण्यांचा चिवचिवाट होईल आणि ना मंदिरात कधी घंटानाद होईल, अशा शब्दांमध्ये अहमद यांनी भारताला धमकी दिली. पाकिस्तान मुस्लिमांचा किल्ला आहे आणि आज साऱ्या जगातील मुस्लिमांचं लक्ष पाकिस्तानकडे आहे, असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं. पाकिस्तानची 20 कोटी जनता इम्रान खान यांच्यासोबत आहे. युद्ध असो वा शांतता, देशातील जनता खान यांच्यासोबत आहे, असं ते म्हणाले. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानIndiaभारत