शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

UNSC च्या ठरावांप्रमाणे काश्मीरवर तोडगा निघावा; पाकिस्तान शांततेसाठी तयार : इम्रान खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 15:05 IST

पाकिस्तानात करण्यात आलं 'काश्मीर सॉलिडॅरिटी डे'चं आयोजन

ठळक मुद्देपाकिस्तानात करण्यात आलं 'काश्मीर सॉलिडॅरिटी डे'चं आयोजनयापूर्वी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनीही केलं होतं शांततापूर्ण वातावरणात चर्चा करण्याचं वक्तव्य

आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्ताननं पुन्हा एकदा जम्मू काश्मीरचा मुद्दा उचलला आहे. शुक्रवारी पाकिस्तानचेपंतप्रधानइम्रान खान यांनी यासंदर्भात काही ट्वीट्स केली. तसंच गेल्या सात दशकांपासून भारतानं काश्मीरच्या लोकांचा आवाज दाबला असल्याचं म्हणत पाकिस्तान कायमच काश्मीरच्या लोकांची साथ देईल असं म्हटलं. इम्रान खान यांनी शुक्रवारी यासंदर्भात लोगापाठ काही ट्वीट केली. संयुक्त राष्ट्राच्या नियमांनुसाप पाकिस्तान जम्मू काश्मीवरवरील तोडगा काढू इच्छित असल्याचं ते यावेळी म्हणाले. काश्मीरची नवी पीढी आपली लढाई लढत आहे आणि पाकिस्तान कायम त्यांच्यासोबत आहे. पाकिस्तान आपल्या बाजूनं शांततेसाठी दोन पावलं पुढे येण्यास तयार असल्याचंही इम्रान खान यांनी नमूद केलं. जम्मू काश्मीरचा मुद्दा पुन्हा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आणण्यासाठी शुक्रवारी पाकिस्तानकडून 'काश्मीर सॉलिडॅरिटी डे'चं आयोजन करण्यात आलं आहे. या अंतर्गत पाकिस्तानच्या निरनिराळ्या भागांमध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.  'काश्मीर सॉलिडॅरिटी डे'च्या दिवशी काश्मीरच्या नागरिरांसोबत पाकिस्तान उभा असल्याचं मी पुन्हा सांगू इच्छितो असं इम्रान खान यांनी ट्वीटमध्ये म्हटलं. काश्मीरच्या लोकांच्या संघर्षाची UNSC च्या अनेक प्रस्तावांमध्ये आंतरराष्ट्रीय समुदायाकडून पुष्टी करण्यात आली आहे. गेल्या सात दशकांपासूनचा कब्जा आणि त्रासदेखील काश्मीरी लोकांचं संघर्ष कमकुवत करू शकला नाही. आता काश्मीरी लोकांची तरूण पीढी संघर्षाला अधिक सकल्पानुसार पुढे नेत असल्याचं त्यांनी नमूद केलं. यापूर्वीही अनेकदा काश्मीरवर भाष्ययापूर्वीही अनेकदा इम्रान खान यांनी आपल्या कार्यकाळात काश्मीरचा मुद्दा उचलला होता. आपल्या भाषणात किंवा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं होतं. परंतु प्रत्येक वेळी त्यांना तोंडावर पडण्याची वेळ आली होती. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि त्यावर कोणताही चर्चेचा विषय नाही हे भारतानं यापूर्वीच स्पष्ट केलं होतं. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांनी आपल्या काश्मीरवरील वक्तव्यावरून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतरच लगेच इम्रान खान यांचे हे ट्वीट आले आहेत. "कोणत्याही क्षेत्राच्या सर्व समस्यांचा तोडगा हा शांततामय वातावरणात झाला पाहिजे. ज्यामुळे मैत्रीचा हात पुढे करता येऊ शकेल," असं बाजवा म्हणाले होते. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानprime ministerपंतप्रधानImran Khanइम्रान खानJammu Kashmirजम्मू-काश्मीरunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ