शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

CoronaVirus: पाकिस्तानमधील कोरोनाग्रस्त वाढले; मदतीसाठी चीनपुढे पसरले हात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 09:37 IST

पाकिस्तानात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता 184 वर पोहोचली आहे. भारतासह संपूर्ण दक्षिण आशियात हा आकडा सर्वाधिक आहे.

ठळक मुद्देपाकिस्तानात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता 184 वर सार्क देशांच्या कोरोनासंदर्भातील बैठकीत पोकिस्तानने आळवला होता पाकिस्तानचा रागपाकिस्तानात दोन डॉक्टरांनाही झालाये कोरोना

इस्‍लामाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानानंतर कोरोनासंदर्भातीली सार्क देशांची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत काश्‍मीरचा राग आळवणाऱ्या पाकिस्‍तानमध्येच आता कोरोना संकट 'आ' वासून उभे राहिले आहे. या संकटापासून बचाव करण्यासाठी पाकिस्‍तानचे राष्‍ट्रपती आरिफ अल्‍वी मदतीची याचना करण्यासाठी चीनला पोहोचले आहेत.

पाकिस्तानात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता 184 वर पोहोचली आहे. भारतासह संपूर्ण दक्षिण आशियात हा आकडा सर्वाधिक आहे.

पाकिस्‍तानातील परिस्थिती इम्रान खान यांच्य दाव्यांपेक्षा पूर्ण पणे भिंन्न आहे. येथील सिंध प्रांत हा कोरोनाचा गड बनत चालला आहे. येथे सर्वाधिक 150 जमांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय खैबर पख्‍तूनख्‍वामध्ये 15, बलुचिस्‍तानमध्ये 10, पंजाबमध्ये 2, राजधानी इस्‍लामाबादमध्ये 2, तर गिलगिट-बाल्टिस्‍तानमध्ये कोरोचाचे 5 रुग्ण आढळले आहेत. पाकिस्‍तानात गेल्या 24 तासांत कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या तीनपट वाढली आहे. यातील तब्बल 115 रुग्ण एकट्या सिंध प्रांतात आढळले आहेत.

कोरोनामुळे दोन डॉक्टकही संक्रमित -सिंध प्रांताचे मुख्‍यमंत्री मुराद अली यांनी जनतेला शांततेचे आव्हान केले आहे. पाकिस्‍तानची आर्थिक राजधानी म्हणवल्या जाणाऱ्या कराचीत कोरोनाचे 30 रुग्ण आढळले आहेत. पाकिस्तानात कोरोना ग्रस्तांवर उपचार करणारे डॉक्टरही सुरक्षित नाहीयेत. येथे दोन डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

द नेशनने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तान इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस (पीआयएमएस) येथे बचावासाठी अत्यावश्यक साधनेही उपलब्ध नाहीत. यामुळे येथे डॉक्टरही सुरक्षित नाहीत. या वृत्तात म्हणण्यात आले आहे, की येथील डॉक्टरांच्या सुरक्षिततेकडेही दुर्लक्ष केले जात आहे.

चीनसमोर पाकिस्तानने पसरले हात -कोरानाचे संकट ओढवल्यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्‍ट्रपती आरिफ अल्‍वी यांना चीनकडे मदतीसाठी पाठवले आहे. चीनवर कोरोनासंकट ओढवल्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या देशाचे राष्ट्रपती चीन दौऱ्यावर गेले आहेत. एवढेच नाही, तर राष्‍ट्रपति अल्‍वी यांचाही हा पहिलाच चीन दौरा आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाPakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानdocterडॉक्टरIndiaभारतchinaचीन