पाकिस्तानकडून युद्धाची तयारी सुरु ? हायवेवर केलं विमानांचं लॅडिंग

By Admin | Updated: September 23, 2016 14:58 IST2016-09-23T14:58:18+5:302016-09-23T14:58:18+5:30

उरी हल्ल्यानंतर परिस्थिती चिघळल्याने हा सराव करण्यात येत नसून प्रशिक्षणाचा भाग असल्याने लॅडिंगचा सराव करण्यात येत असल्याची माहिती पाकिस्तानने दिली आहे

Pakistan preparing for war? Flying on the highway | पाकिस्तानकडून युद्धाची तयारी सुरु ? हायवेवर केलं विमानांचं लॅडिंग

पाकिस्तानकडून युद्धाची तयारी सुरु ? हायवेवर केलं विमानांचं लॅडिंग

>ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 23 - हवाई दलाच्या विमानाचं लॅडिं करण्यासाठी पाकिस्तानमधील मुख्य हायवे बंद ठेवण्यात आले होते. उरी हल्ल्यानंतर परिस्थिती चिघळल्याने हा सराव करण्यात येत नसून प्रशिक्षणाचा भाग असल्याने लॅडिंगचा सराव करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.  दोन दिवसांच्या या सरावासाठी इस्लामाबाद ते लाहोरदरम्यानची वाहतूकही जुन्या रस्त्याने वळवण्यात आली होती. 
 
'धावपट्या खराब झाल्यास पर्यायी मार्ग म्हणून हायवेंवर लॅडिंगचा सराव केला जात आहे. गेली अनेक वर्ष हा सराव करत आहोत,' असं पाकिस्तान हवाई दलाचे प्रवक्ते जावेद मोहम्मद अली यांनी सांगितलं आहे. 'उरी हल्ल्यानंतर भारत हल्ला करेल या भीतीने आम्ही हा सराव करत नाही आहोत. हल्ला आणि सरावाची वेळ एकत्र येणे हा योगायोग असल्याचंही,' जावेद मोहम्मद अली बोलले आहेत.
 

Web Title: Pakistan preparing for war? Flying on the highway