शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

Pakistan PM Saudi Visit: पाक पंतप्रधान सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर, मशिदीत जाताच लोकांनी दिल्या 'चोर-चोर'च्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 09:35 IST

Pakistan PM Saudi Visit: पाकिस्तानचे नवनिर्वाचीत पंतप्रधान शेहबाज शरीफ तीन दिवसांच्या सौदी अरेबिया दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांचे शिष्टमंडळ मदिना येथील मस्जिद-ए-नबावी येथे पोहोचले असता, लोकांनी मोठ्याने 'चोर-लुटेरे' अशा घोषणा सुरू केल्या.

Pakistan PM Saudi Arabia Visit:  पाकिस्तानचे नवनिर्वाचीत पंतप्रधान शेहबाज शरीफ यांना सौदी अरेबियात मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला. शरीफ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ तीन दिवसांच्या सौदी अरेबिया दौऱ्यावर गेले आहे. यादरम्यान हे शिष्टमंडळ मदिना येथील मस्जिद-ए-नबावी येथे पोहोचले असता, लोकांनी मोठ्याने 'चोर-लुटेरे परत जा...' अशा घोषणा सुरू केल्या. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. 

घोषणाबाजी करणाऱ्यांना अटक एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, या घटनेनंतर पोलिसांनी पावित्र्याचे उल्लंघन केल्याबद्दल घोषणा देणाऱ्यांना अटक केली. एका व्हिडिओमध्ये पाकिस्तानचे माहिती-प्रसारण मंत्री मरियम औरंगजेब आणि नॅशनल असेंब्ली सदस्य शाहजैन बुगती इतरांसह दिसत आहेत. ते मदिना येथील मस्जिद-ए-नबावी येथे पोहोचले असता, लोकांनी घोषणा सुरू केल्या. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत पंतप्रधान शरीफ नव्हते. 

निदर्शनांमागे इम्रानला जबाबदार धरलेपाकिस्तानी वृत्तपत्रानुसार, औरंगजेबने या निषेधामागे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना जबाबदार धरले आहे. एक्सप्रेस ट्रिब्यूनने औरंगजेबच्या हवाल्याने म्हटले आहे की, 'मी या पवित्र भूमीवर त्या व्यक्तीचे नाव घेणार नाही, कारण मला या भूमीचा राजकारणासाठी वापर करायचा नाही. पण त्यांनी (इमरान खान) पाकिस्तानी समाज उद्ध्वस्त केला आहे.' दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे सौदी अरेबियाच्या तीन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या सौदी दौऱ्यावर डझनभर अधिकारी आणि राजकीय नेते त्यांच्यासोबत गेले आहेत.

घटनेचे पाकिस्तानमध्ये पडसाद दरम्यान, सौदी अरेबियात घडलेल्या घटनेचे पाकिस्तानात पडसाद उमटू लागले आहेत. पाकिस्तानच्या जम्हूरी वतन पक्षाचे अध्यक्ष शाहझैन बुगती यांच्या समर्थकांनी शुक्रवारी सौदी अरेबियातील घटेनेनंतर पाक संसदेचे माजी उपसभापती कासिम सुरी यांच्यावर हल्ला केला. त्यांना मारहाण करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. पाकिस्तानी पत्रकार मुर्तझा अली शाह यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. 

पाक पंतप्रधान सौदी अरेबियाकडून 3.2 अब्ज डॉलरची मागणी करणार विशेष म्हणजे 11 एप्रिल रोजी शरीफ यांनी पाकिस्तानचे 23 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. या भेटीदरम्यान शरीफ सौदी अरेबियाकडून 3.2 अब्ज डॉलरच्या अतिरिक्त पॅकेजची मागणी करणार आहेत. पाकिस्तानच्या परकीय चलनाच्या साठ्यात आणखी घट होऊ नये यासाठी ते ही विनंती करणार आहे. सौदी अरेबियाने इम्रान खानच्या कार्यकाळात आधीच कर्जबाजारी झालेल्या पाकला 3 अब्ज डॉलर्सची मदत केली होती.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानsaudi arabiaसौदी अरेबियाImran Khanइम्रान खान