शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

इम्रान खान यांचं भाषण पाकिस्तानी लष्कराकडून एडिट? 6 मिनिटांच्या व्हिडीओत 20 कट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 17:08 IST

पुलवामा हल्ल्यात हात नसल्याची खान यांच्याकडून सारवासारव

इस्लामाबाद: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर भारत आक्रमक झाला आहे. एका बाजूला पाकिस्तानच्या आर्थिक कोंडीचे प्रयत्न सुरू असताना दुसऱ्या बाजूनं दहशतवाद्यांविरोधातल्या कठोर कारवाईला वेग आला आहे. पुलवामा हल्ल्याच्या सूत्रधारांना लष्कर आणि पोलिसांना संयुक्त कारवाई करत यमसदनी धाडलं. यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज खुलासा केला. पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात नसल्याची सारवासारव त्यांनी केली. मात्र इम्रान खान यांच्या 6 मिनिटांच्या व्हिडीओत 20 पेक्षा जास्त एडिट आहेत. त्यामुळे पाकिस्तानी लष्करानं खान यांचं स्पष्टीकरण एडिट केलं का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 च्या सुमारास देशाला संबोधित केलं. भारत कोणत्याही ठोस पुराव्यांशिवाय आरोप करत असल्याचा दावा त्यांनी केला. खान देशाला संबोधित करतील, अशी सूचना आधीच देण्यात आली होती. मात्र इम्रान खान यांचा व्हिडीओ रेकॉर्डेड होत असल्याचं आता समोर आलं आहे. विशेष म्हणजे यात जवळपास 20 हून अधिक कट्स दिसत आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ एडिट करुन मगच तो प्रसारित करण्यात आला, हे सिद्ध होतं. पाकिस्तानचे पंतप्रधान लष्कराच्या परवानगीशिवाय कोणतेही निर्णय घेत नाहीत, हे जगजाहीर आहे. त्यामुळे या एडिटमागे पाकिस्तानचं लष्कर असल्याची चर्चा जगभरात सुरू आहे. इम्रान खान यांचं भाषण 6 मिनिटांचं आहे. यामध्ये 1.40 सेकंद, 1.48 सेकंद, 1.55 सेकंदांवर कट्स आहेत. इथून कट्सची सुरुवात होते. यानंतर व्हिडीओ संपेपर्यंत अनेक ठिकाणी कट्स पाहायला मिळतात. त्यामुळे व्हिडीओ खूप ठिकाणी एडिट करण्यात आला, हे स्पष्टपणे दिसून येतं. इम्रान खान यांना पंतप्रधान करण्यात लष्कराची महत्त्वाची भूमिका असल्याच्या चर्चा अनेकदा झाल्या आहेत. लष्कराचा आशीर्वाद असल्यानंच खान पंतप्रधान झाले, असं विश्लेषण जागतिक घडामोडीच्या जाणकारांनी अनेकदा केलं आहे. खान यांनी निवडणूक प्रचारादरम्यान अनेकदा लष्कराचा कैवार घेणारी विधानं केली होती. याशिवाय ते सत्तेवर आल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी कारवाया कमी झालेल्या नाहीत. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी