शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

Video : भूगोलच नाही, तर इम्रान खान यांचं गणितही कच्चं; म्हणाले, 'भारताची लोकसंख्या १ अब्ज ३०० कोटी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 08:38 IST

Pakistan PM Imran Khan : इम्रान खान यांनी भारताची लोकसंख्या १ अब्ज ३०० कोटी असल्याचं म्हटलं. यापूर्वी जपान आणि जर्मनीही शेजारी देश असल्याचं केलं होतं वक्तव्य.

ठळक मुद्दे इम्रान खान यांनी भारताची लोकसंख्या १ अब्ज ३०० कोटी असल्याचं म्हटलं.यापूर्वी जपान आणि जर्मनीही शेजारी देश असल्याचं केलं होतं वक्तव्य.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर पुन्हा एकदा सामान्य ज्ञानावरून टीका होताना दिसत आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आपल्या जनतेला संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी भारताची लोकसंख्या १ अब्ज ३०० कोटी असल्याचं वक्तव्य केलं. एवढंच नाही, तर आकडेवारीबाबत बोलताना त्यांना नीटही बोलता आलं नाही. यापूर्वीही त्यांच्या सामान्य ज्ञानावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यांनी तेहरानमध्ये जापान आणि जर्मनी आपले शेजारी देश असल्याचं म्हटलं होतं. तसंच त्यांनी चीन हा पाकिस्तानचा शेजारी देश असल्याबाबतही नकार दिला होता. 

इम्रान खान यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्यांची क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी क्रिकेटमध्ये दोन वर्ल्ड कप असल्याचंही म्हटलं. त्यापैकी एक म्हणजे टेस्ट क्रिकेट आणि दुसरा म्हणजे वनडे क्रिकेट असंही ते म्हणाले, यानंतर जून महिन्यात झालेल्या आयसीसी टेस्ट क्रिकेट चॅम्पिअनशीबाबत न्यूझीलंडची वाहवा करताना न्यूझीलंडची लोकसंख्या चाळीस पन्नास लाख, तर भारताची लोकसंख्या १ अब्ज ३०० कोटी असल्याचं सांगत  त्यांनी भारताला टेस्ट चॅम्पिअनशीपमध्ये पराभूत केल्याचं म्हटलं. जपान, जर्मनी शेजारी देशयापूर्वी २०१९ मध्ये इम्रान खान यांनी इराणचा दौरा केला होता. त्यावेळी पत्रकारांसमोर बोलताना जापान आणि जर्मनी ही पाकिस्तानची शेजारी राष्ट्र असल्याचं म्हटलं होतं. भौगोलिक दृष्ट्या जपान आणि जर्मनी एकमेकांपासून हजारो किलोमीटर दूर आहेत. "जपान आणि जर्मनीनं एकमेकांच्या देशात नरसंहार केल्यानंतर करार केला होता. त्यामुळेच दोन्ही देशांमध्ये व्यापार अधिक उत्तम आहे," असं ते म्हणाले होतं. जून २०२१ मध्ये एका मुलाखतीत बोलताना चीन हा पाकिस्तानचा शेजारी देश असल्याचं इम्रान खान यांनी मानलं नव्हतं. "जे देश आमच्या सीमेला लागून आहेत त्याबाबत मी अधिक चिंतीत आहे," असं ते म्हणाले होते. दरम्यान, चीनचा शिंजियांग प्रांत हा पाकिस्तानच्या सीमेवरच आहे.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानprime ministerपंतप्रधानIndiaभारतNew Zealandन्यूझीलंडJapanजपानGermanyजर्मनी